Commissioner Ravindra Jadhav along with Additional Commissioner Rajendra Fatle etc. while giving information about Bharat Sankalp Yatra, Cleanliness Campaign and various works developed in Municipal Commissioner Conference Hall. esakal
नाशिक

Nashik News: महानगरपालिका उत्पन्न वाढीसाठी नियोजन करणार : आयुक्त रवींद्र जाधव

महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीसाठी सर्वतोपरी उपाययोजना करू. घरपट्टी, नळपट्टी, संकीर्ण कर वसुलीवर तूर्त लक्ष केंद्रित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीसाठी सर्वतोपरी उपाययोजना करू. घरपट्टी, नळपट्टी, संकीर्ण कर वसुलीवर तूर्त लक्ष केंद्रित केले आहे. अवैध नळजोडणी धारकांना नळजोडण्या कायम करून उत्पन्न वाढीसाठी दंड कमी करण्याचा विचार आहे.

मार्चअखेर वसुलीचे काम पूर्ण झाल्यानंतर उत्पन्न वाढीसाठी नियोजन करण्यात येईल. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी अत्यावश्‍यक पदांसाठीची नोकरभरती करण्यात येईल असे आयुक्त रवींद्र जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. (Commissioner Ravindra Jadhav statement malegaon Municipal Corporation will plan to increase income Nashik News)

मनपाच्या आयुक्त कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या संवाद कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

श्री. जाधव म्हणाले, की जनतेची कामे वेळेत व्हावी याकडे आपला कटाक्ष आहे. नागरिकांच्या समस्या जाणवून घेत त्यांची लवकरात लवकर सोडवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहोत. शासन नियमाप्रमाणे आठवड्यातून पाचच दिवस मनपाचे कामकाज असते.

मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना विश्‍वासात घेत शनिवारी सुटीच्या दिवशी सकाळी काही तास शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्याचा उपक्रम सुरु आहे. अधिकारी, विभाग प्रमुखांनी यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

मंगळवारी (ता. ९) शहरातील दोन प्रभागातील हजेरी सेंटरची तपासणी केली. बहुसंख्य कर्मचारी हजर होते. स्वच्छता विभागाचे काम सुरळीत सुरु आहे. प्रशासनाने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

ही मोहीम प्रचार, प्रसार व कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष काम करण्यावर आपला भर आहे. शहर स्वच्छतेचे प्रश्‍नही लवकरच मार्गी लागतील. मैला डेपोला भेट देतानाच विविध साइट व काही ले-आऊटची तपासणी केल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

विकसित भारत संकल्प यात्रेला मोठा प्रतिसाद

शहरातील प्रमुख भाग व नववसाहतींना भेट देत माहिती जाणून घेतो. शहरवासिय, लोकप्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक यांना विश्‍वासात घेऊन कामकाज केल्यास त्याचे चांगले परिणाम होतात याची प्रचिती आली आहे.

शहरातील वेगवेगळ्या भागात दररोज २६ जानेवारीपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम सुरु आहे. स्थानिक परिस्थिती पाहता विकसित भारत संकल्प यात्रेला शहरातील पुर्व भागात प्रतिसाद मिळेल की नाही याबद्दल सांशकता होती.

तथापि लाभार्थींना विश्‍वासात घेऊन कामकाज केल्याने या यात्रेच्या माध्यमातून ४ हजार ७२९ घरांनी शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ घेतला. अन्य शहरांच्या तुलनेत विकसित भारत संकल्प यात्रेला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला.

२४ वेगवेगळ्या ठिकाणी सकाळ व दुपार दोन टप्प्यात या यात्रेच्या माध्यमातून कामकाज झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र फातले, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे आदी उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी

पीएम स्वनिधी - २ हजार ६२७

पीएम आवास योजना - १ हजार ८९७

आयुष्यमान कार्ड - १ हजार ५३४

उज्ज्वला योजना - ९४७

आधार कार्ड - ४२५

प्रयोग शाळा तपासणी - ४४७

दमा, मधुमेह, एनसीडी तपासणी - १ हजार ६१९

क्षयरोग विभाग - २३१

बॅंकींग सेवा योजना - ६११

---------------------------

एकूण - ४ हजार ७२९

पुरुष - २ हजार ४७९, स्त्रिया - २ हजार २५०

एकूण संकल्प शपथ - २ हजार ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT