sand ( file photo ) esakal
नाशिक

Nashik News : 600 रुपयांत वाळू ठरणार दिवास्वप्नच; शासकीय धोरणाला अपेक्षित प्रतिसाद नाही

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सामान्य नागरिकांना सहाशे रुपयात वाळू देण्याची घोषणा होऊन वर्ष होईल, पण सामान्यांना अजूनही सहाशे रुपयांत वाळू मिळण्याची चिन्हे दिसेनात.

शासनस्तरावर घोषणा झाली, प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली पण या धोरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सहाशे रुपयात वाळू हे दिवास्वप्नच राहणार का असा प्रश्न आहे.(common man will still see no signs of getting sand for 600 rupees nashik news )

मागील मे महिन्यात शासनाने सामान्यांना सहाशे रुपयांत वाळू देण्याचे जाहीर केले. पण पुढील मे महिन्यापर्यंत हा विषय मार्गी लागेल असे वाटत नाही. पहिल्या टप्प्यात त्याला विरोध झाला. अनेक भागात प्रतिसाद मिळाला नाही. दिवाळीपूर्वी काढलेल्या निविदा प्रक्रियेची हीच स्थिती आहे. अवघ्या तीन ठिकाणीच प्रतिसाद मिळाल्याने घोषणेला वर्ष झाल्यानंतर तरी प्रतिसाद मिळणार का हा प्रश्न आहे.

शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करताना दिवाळीपूर्वी बागलाण, नांदगाव, नांदगाव, कळवण, देवळा व मालेगाव तालुक्यांतील तेरा वाळू डेपोसाठी निविदा प्रसिद्ध केल्या. मात्र, यापैकी केवळ कळवण तालुक्यातील तीन टेंडरला प्रतिसाद मिळाला.

उर्वरित एकाही टेंडरला प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे मागील हंगामाप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील वाळू डेपोसाठी ठेकेदार मिळण्याचा मार्ग अवघड आहे. सध्या फक्त निफाड तालुक्यातील चांदोरी, जळगाव तसेच नाशिक तालुक्यातील चेहेडी येथील तीन ठिकाणी वाळू घाटावरून वाळू उपसा सुरु आहे.

जिल्हयात सुरवातीला १३ वाळू घाटांना परवानगी देण्यात आली, पुढे त्यांची संख्या वाढून १६ झाली. मालेगाव तालुक्यात कळवण, देवळा, बागलाण, निफाड, नांदगाव, निफाड या तालुक्यांमध्ये १६ वाळू घाट व ३६ डेपो निश्चित करण्यात आले आहेत. या वाळू घाटावरून मागील हंगामात पावसाळ्यापूर्वी ९० हजर मेट्रिक टन वाळू उपसा करण्याचे निश्चित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT