chandwad onion.jpg 
नाशिक

'इथं' बांधावरच होतेय कांदा खरेदी अन् विक्रीही...शेतकऱ्यांकडून देखील मिळतेय पसंती!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (खामखेडा) कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही बाजार समित्या सुरू, तर काही बंदमुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत देवळा तालुक्‍यातील सावकी येथील फाइव्ह स्टार फार्मर प्रोड्यूसर कंपनीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर कांदा खरेदी करीत विक्रीचीही व्यवस्था केली आहे. बाजारापेक्षा दोन रुपये जागेवरच जास्त दर मिळत असल्याने शेतकरी त्यास पसंती देत आहे. 

20 व 50 किलो वजनाचे पॅकिंग

या कंपनीद्वारे तालुक्‍यातील सावकी, खामखेडा, दारणा, विठेवाडी या गावांमधून आतापर्यंत 1000 ते 1200 टन कांद्याची खरेदी केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातच हाताळणी, प्रतवारी करून 20 व 50 किलो वजनाचे पॅकिंग केले जाते. यासाठी लागणाऱ्या गोण्या, साहित्य व वाहतूक व्यवस्था कंपनीकडून शेतकऱ्यांना पुरविण्यात आली आहे. मालाचा चेन्नई, मुंबई येथील व्यापारी, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला पुरवठा केला जात आहे. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल शिवले, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक दिलीप पाटील, गणेश टिपले, भाऊसाहेब पवार, किरण निकम, नीलेश पाटील, सारिका शिवले आदी व्यवस्थापन करीत आहेत. तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश देवरे यांच्या समन्वयातून शेतकरी कंपनीला सहाय्य मिळत आहे. 

सध्या कांद्याला सात ते नऊ रुपये दर मिळत आहे. फाइव्ह स्टार फार्मर प्रोड्यूसर कंपनीने 14 रुपये दराने एक किलो पॅकिंग साइजमध्ये परिसरातून कांदा खरेदी केला. सध्या कुठलेच मार्केट सुरू नसताना शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदी होत असून, चांगला दर मिळत आहे. - बापू बोरसे, सावकी, कांदा उत्पादक  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT