Nashik News esakal
नाशिक

Nashik News : येवल्यात बाजार समितीच्या 18 जागांसाठी राहणार जोरदार चुरस

सकाळ वृत्तसेवा

येवला : माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा माहोल तापू लागला असून राजकीय घडामोडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

अवघे साडेतीन हजार मतदार असलेली ही निवडणूक असली तरी राजकारण मात्र विधानसभेच्या तोडीचे होणार असल्याने १८ जागांसाठीच्या घडामोडीचा राजकीय उष्मा गरम झाला आहे.

आशिया खंडातील प्रसिद्ध लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पाठोपाठ वलय असलेली ही बाजार समिती शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. बाजार समितीच्या सत्ताकारणाचा फायदा सहकाराच्या माध्यमातून होत असतोच, पण तालुक्यातील इतर मोठ्या निवडणुकांसाठी येथील सत्तेचा फायदाही होत आला आहे. त्यामुळे बाजार समिती आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी नक्कीच सर्वच गट शर्थीचे प्रयत्न करू लागले आहेत.

मागील पंचवार्षिकला येथील बाजार समितीवर छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली होती. यावेळी मात्र सर्व राजकीय गणिते गुंतागुंतीची बनली असल्याने आगामी घडामोडींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. नेत्यांच्या हालचाली व संभाव्य पॅनलनिर्मिती विषयी देखील तर्कवितर्क लढविले जात आहेत.

असे आहेत मतदार..!

नव्या नियमानुसार कुठल्याही गटातून शेतकरी व पात्र असलेला व्यक्ती उमेदवारी करू शकणार आहे. त्यामुळे पॅनलसह इच्छुकांचे पेव फुटताना दिसेल. त्याचवेळी मतदारसंख्या मात्र मर्यादित असल्याने मतदारांना आपलेसे करण्यासाठी नेतेमंडळींना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील हे नक्की.

बाजार समितीसाठी सोसायटी गटात १ हजार ८४०, ग्रामपंचायत गटात ८३४, हमाल मापारी गटात ३५३, व्यापारी गटात ४२३ असे एकूण ३ हजार ४५० मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहे.

उद्यापासून अर्ज दाखल करणार

संचालकांच्या १८ असून यात सोसायटी गटाच्या ११ जागा आहेत. यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७, महिला राखीव २, इमाव १ व भटक्या जाती-जमातीची १ जागा आहे. ग्रामपंचायत गटात ४ जागा आहेत.

यात सर्वसाधारणसाठी २, आर्थिक दुर्बल घटकासाठी १, अनुसूचित जाती जमातीसाठी १ जागा आहे. व्यापारी गटासाठी २ व हमाल मापारी गटासाठी १ जागा आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने निवडणुकीचा फड चांगलाच रंगणार आहे.

त्यामुळे या घडामोडींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तहसीलदार प्रमोद हिले यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे त्यांना सहकार्य करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT