Jayesh Ahire of NCP Youth Congress giving a statement to District Deputy Registrar Fayaz Mulani regarding the mismanagement of market committee in Nampur. esakal
नाशिक

Nashik News: नामपूर बाजार समिती शेडच्या कामाबाबत तक्रार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील बाजार समितीत प्रशासकांच्या नेमणूकीआधी नळकस रस्त्यालगत पावसाळ्यातील कांदा लिलावासाठी सुरू असलेल्या शेडच्या कामाचे वाढीव बिल अदा केल्याची तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जयेश अहिरे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Complaint about Nampur Bazar Samiti shed work Nashik New)

येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपल्याने मालेगाव येथील सहकार अधिकारी स्वप्नील मोरे यांची प्रशासकपदी नेमणुक झाली आहे. परंतु त्यांनी पदभार घेण्याआधी देण्यात आलेल्या देयकांबद्दल सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नळकोस रोडच्या आवारात लिलाव शेडचे काम चालु झालेले आहे. काम अपूर्ण असतानाही ७५ लाख रुपयांचा धनादेश अदा करण्यात आल्याची तक्रार जयेश अहिरे यांनी निवेदनात केली आहे.

प्रत्यक्षात सदर काम फक्त १० ते १५ लाखाचे झाले आहे. काम अपूर्ण असताना मूल्यांकन जास्त दिलेच कसे? असा सवाल निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. बाजार समितीच्या सचिव व संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात अपहार करण्याच्या उददेशानेच सदर धनादेश अदा केलेला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बँकेतील मुदत ठेवी मोडून ही रक्कम अदा केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. सदर बाब अतिशय गंभिर स्वरूपाची असून अनागोंदी, कायद्याचे व शासनाच्या नियमांची पायमल्ली करणारी आहे.

त्यामुळे सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभिर्याने दखल घेऊन संबंधित ठेकेदारास बाजार समितीमार्फत बिलापोटी अदा करण्यात आलेला धनादेश वसूल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT