nashik press esakal
नाशिक

नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : ‘पाचशे’ची दहा बंडले गहाळ

अंबादास शिंदे

नाशिक रोड : भारत सरकारच्या जेल रोड येथील नोटा छापण्याच्या कारखान्यातून (चलार्थपत्र मुद्रणालय) पाचशे रुपयांचे एक अशी दहा बंडले म्हणजेच एकूण पाच लाख किमतीच्या नोटा गहाळ झाल्याची तक्रार मुद्रणालयाच्या व्यवस्थापनाकडून उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी प्रेस व्यवस्थापनाशी प्राथमिक चर्चा घेऊन माहिती घेतली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी दिली. (Complaint-to-Police-from-nashik-Notepress-Management-marathi-news-jpd93)

‘पाचशे’ची दहा बंडले गहाळ

उपायुक्त खरात म्हणाले, की नोटा गहाळ घटना गेल्या फेब्रुवारीमधील आहे. त्याच्या चौकशीसाठी मुद्रणालय व्यवस्थापनाने दक्षता व सत्यशोधन समिती नेमली होती. समितीच्या अहवालाच्या आधारे पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. समितीचा अहवाल पोलिसांना देण्यात आला. नोटांची अनेक बंडले असल्यामुळे ती इतर बंडलांमध्ये मिसळली की काय याचा शोध मुद्रणालय व्यवस्थापन घेत होते. त्यामुळे जुलैमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पाच लाखांची चोरी झाली की या नोटा गहाळ झाल्या याबाबत विचारले असता उपायुक्त विजय खरात म्हणाले, की मुद्रणालय नियमानुसार अंतर्गत चौकशी केली. त्यासाठी सत्यशोधन समिती नियुक्ती केली होती. तिचा अहवाल आल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय मुद्रणालयाने घेतला. त्यांचा प्रतिनिधी मंगळवारी (ता. १३) पोलिस ठाण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासणार

प्रेसमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासणार आहेत. तो महत्त्वाचा पुरावा आहे. गेल्या फेब्रुवारीमधील ही घटना आहे. सत्यशोधन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्याचा अभ्यास करून तपास केला जाईल. दरम्यान, याबाबत प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती देण्यास मुद्रणालय व्यवस्थापन अथवा कामगार नेत्यांनी असमर्थता दर्शविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT