bank.jpg 
नाशिक

...काय सांगता बॅंकेत पैसेच नाही?...खातेदार झाले त्रस्त!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (कनाशी) येथील महाराष्ट्र बॅंकेत ग्राहकांना वेळेत पैसे मिळत नसून, 10 ते 40 हजार रुपये काढायचे असल्यास दुपारी दोन नंतर मिळतील, असे खातेदारांना सांगितले जात आहे. 200 ते 50 हजार रुपये काढण्यासाठी खातेदारांनी सकाळी दहापासून रांग लावली होती. 

केवळ तीनच कर्मचारी बॅंकेत

कनाशी परिसरातील 35 ग्रामपंचायती, शासकीय व खासगी शाळा, सरकारी कार्यालयांना सेवा देणारी तसेच सुमारे पाच लाख खातेधारक असणारी महाराष्ट्र बॅंक केवळ आठशे स्क्वेअरफूट जागेत आपला "व्यवहार' करीत आहे. त्यातच जयदर, दळवट, कनाशी, पाळे येथील जिल्हा बॅंकेच्या शाखा बंद झाल्याने त्यांच्या सर्व खातेदारांनी महाराष्ट्र बॅंकेत खाते उघडले आहे. केवळ तीनच कर्मचारी बॅंकेत आहेत. त्यातल्या त्यात सुरक्षारक्षक, शिपाई देखील नाही. 

जीर्ण जीना 

पहिल्या मजल्यावर छोट्याशा जागेत बॅंक असून, बॅंकेत जाण्यासाठी असलेला लोखंडी जीना जीर्ण झाला आहे. कधीही कोसळून दुर्घटना होण्याची शक्‍यता खातेदार व्यक्त करतात. गर्भवती, ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता बॅंकेची जागा बदलावी, या मागणीचे निवेदन शाखा व्यवस्थापकांना शुक्रवारी (ता. 28) देण्यात आले. निवेदनावर 37 खातेदारांच्या सह्या आहेत. 

एटीएम नावालाच 

बॅंकेशेजारीच एटीएम असून, ते कायम बंद असते. उघडे असल्यास त्यात पैसेच नसतात. पैसे असल्यास तांत्रिक बिघाड ठरलेला असतो. यूपीएस सिस्टिम नसल्यामुळे बिघाड होतो, असे शाखा व्यवस्थापकांनी सांगितले. बॅंक बंद झाल्यास एटीएम बंद असते. 

रिटेंशन मर्यादा 15 वरून 25 हजार व्हावी. थेट कनाशीपर्यंत पैसे पोचविण्याची व्यवस्था असावी. सिक्‍युरिटी, क्‍लार्क यांची अतिरिक्त भरती केल्यास आणि नवीन जागेत स्थलांतर झाल्यास बॅंकेचे व्यवहार सुरळीत होतील. - इंद्रदेव कुमार, शाखा व्यवस्थापक 

सकाळी दहापासून 13 हजार रुपये घेण्यासाठी बॅंकेत आलो असता, दुपारी दोननंतर या, असे मला सांगितले. - माणिक बागूल, खातेदार 

मला दवाखान्यासाठी चाळीस हजार रुपयांची तत्काळ गरज असताना, पैसे मिळाले नाहीत. - एक त्रस्त महिला, खातेदार  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : बालेवाडीत ढगांची गर्दी; रिमझिम पावसाची सुरुवात

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT