Oxygen
Oxygen esakal
नाशिक

नाशिकमध्ये ऑक्सिजनची पूर्तता व्हावी यासाठी सर्वंकष प्रयत्न - जिल्हाधिकारी मांढरे

महेंद्र महाजन

नाशिक : जिल्ह्यात सध्या सर्वत्र वाढत असलेली कोरोना रूग्णांची संख्या व त्याप्रमाणे लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची पूर्तता संबंधित रूग्णालयांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्वरीत व्हावी यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक व मालेगाव महानगरपालिकेसह जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मदत व माहिती कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.

रुग्णालयांना सुलभरीत्या व्हावी माहिती

नाशिक मनपा हद्दीतील संपूर्ण व्यवस्थेचे सनियंत्रण महानगरपालिकेकडून केले जाणार असून ग्रामीण भागाचे सनियंत्रण जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून केले जाणार आहे. मालेगाव महापालिका व लगतच्या परिसराचे सनियंत्रण अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडून केले जाणार आहे. प्रत्येक पुरवठादारांकडे उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनची माहिती एफडीए च्या अधिकाऱ्यांकडून दर तीन तासांनी या मदत व माहिती कक्षास उपलब्ध होईल. त्या-त्या हद्दितील रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत चौकशी करण्यासाठी व त्यासंबंधीच्या इतर माहितीसाठी वरीलप्रमाणे मदत कक्षास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात कोवीड बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील पुरवठादाराकडे ज्याप्रमाणे टँकर प्राप्त होतील तसे रुग्णालयांनी त्या-त्या पुरवठादारांशी संपर्क करून योग्य प्रमाणात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यामुळे दिवसभरात कोणत्या पुरवठादारांकडून ऑक्सिजन उपलब्ध आहे याची माहिती रुग्णालयांना सुलभरीत्या व्हावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.

असे आहेत मदत व माहिती केंद्रांचे क्रमांक…

  • नाशिक महानगरपालिका हद्दितील रुग्णालयांसाठी- 0253 -2220800

  • मालेगांव महानगरपालिका हद्दितील रुग्णालयांसाठी - 8956443068 व 8956443070

  • नाशिक ग्रामिण हद्दितील रुग्णालयांसाठी - 9405869940

''वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नाशिक व मालेगाव महापालिकेसह ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मदत आणि माहिती कक्ष कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आपापल्या कार्यक्षेत्राप्रमाणे रुग्णालयांनी मदत कक्षाकडून माहिती घेवून ऑक्सिजन प्राप्त करून घ्यावा.''

-जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT