medicine seller.jpg 
नाशिक

"त्या औषध विक्रेत्याच्या मृत्यूला कारण कोरोना असेल तर..?".गावात उलट-सुलट चर्चा 

अशोक गवळी

नाशिक : सुरगाणा शहरातील औषध विक्रेता जयवंत वाघ यांचा मृत्यू कोरोनाने झाला का ? यकृत विकाराने या बाबतीत शहरात व तालुक्यात उलटसुलट चर्चा होत आहे. कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी ठरु शकतो.या बाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी होत आहे. 

सुरगाणा शहरात शोककळा

गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून जयवंतराव शिवाजी वाघ वय 55 रा.  गणेश खेडगाव हे औषध विक्रेते व्यवसाय करीत होते. गणेश मेडीकल नावाने संपुर्ण तालुक्यात परिचित होते.त्यांना पाच ते सात वर्षापासून काविळी व  यकृताचा विकार बळावलेला होता.त्याच्यावर उपचार सुरू होते.मात्र त्याचवेळी त्यांचा नाशिक येथे कोविड रुग्णांशी संपर्क आल्याने कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर नाशिकमध्ये अशोका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.मात्र त्यांना यकृताचा विकार आधीच जडलेला असल्याने अखेर मृत्यूने त्यांना कवटाळले. त्यांच्या निधनाने सुरगाणा  शहरात शोककळा पसरली असून दुकाने बंद करुन  शोक व्यक्त करण्यात आला.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.


संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

Rahul Gandhi: ‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आरएसएसचे कॉर्पोरेटायझेशन झाले..

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT