Confusion of corona report in nashik district hospital marathi news 
नाशिक

कोरोना रिपोर्टच्या गोंधळाने रूग्‍णासह नातेवाईकांचा मनस्‍ताप 

अरुण मलाणी

नाशिक : कोरोना सदृष्य लक्षणे दिसू लागल्‍याने बागलाण तालुक्‍यातून महिला रूग्‍णाला जिल्‍हा रूग्‍णालयात दाखल केले होते. एक आठवडाभरात रूग्‍णालयातील कारभार, कोरोनाविषयक रिपोर्टचा गोंधळ यामुळे महिला रूग्‍णासह नातेवाईकांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी (ता.१८) यासंदर्भात जिल्‍हा प्रशासनाकडे दाद मागायला पोहोचलेल्‍या रूग्‍णाच्‍या नातेवाईकांना न्‍याय मिळालाच नाही. परंतु उलट पोलिस ठाण्यात बसून सायंकाळ काढावी लागली. 

यासंदर्भात मयुर अलई यांनी दिलेली माहिती अशी, की बागलाण तालुक्‍यातील नामपूर येथील महिला रूग्‍णाला गेल्‍या ९ सप्‍टेंबरला रूग्‍णवाहिकेद्वारे जिल्‍हा रूग्‍णालयात आणण्यात आले. बराच वेळाच्‍या प्रतिक्षेनंतर रूग्‍णाला रूग्‍णालयात दाखल करून घेतले गेले. जेवणाची व्‍यवस्‍था नसल्‍याने नातेवाईकांमार्फत जेवणाची सुविधा करण्यात आली. आठ दिवसांहून अधिक काळ उलटला असतांना, रूग्‍ण महिलेचा मुलगा चेतन अलई हा आईच्‍या डिस्‍चार्जची चर्चा करण्यासाठी गेला असता, रूग्‍णाचा अहवाल निगेटीव्‍ह असल्‍याने, घरी नेण्याचा सल्‍ला संबंधित परीचारीकेने दिला. तर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अलई हे डॉ.धुम यांच्‍याकडे गेले असता, अद्याप स्‍वॅबचा अहवाल आला नसून, तुम्‍ही तुमच्‍या जबाबदारीवर रूग्‍णाला घरी नेऊ शकतात असा अजब खुलासा केला. ही गोष्ट ऐकल्‍यानंतर अलई यांच्‍यासह नातेवाईक सुन्न झाले. आठवडाभराचा कालावधी उलटूनही अहवाल आलेला प्राप्त न झाल्‍याचा अजब प्रकार घडल्‍याचे सांगण्यात आले. 

प्रशासनाकडून दाद नाही 

यासंदर्भात चेतन अलई व मयुर अलई हे जिल्‍हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तेथे निवासी उपजिल्‍हाधिकारी यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्‍न केला. परंतु तेथे त्‍यांची आपबिती ऐकण्याऐवजी गैरवर्तनुक करण्यात आल्‍याचा आरोप अलई यांनी केला आहे. न्‍याय मिळत नसल्‍याने कार्यालयात उपोषणास बसत असतांना, सरकारवाडा पोलिसांना पाचारण करण्यात आले. यातून अलई यांना सायंकाळ पोलिस ठाण्यात बसून काढावी लागली. मात्र जिल्‍हा रूग्‍णालय व प्रशासनाच्‍या कारभाराविषयी अत्‍यंत निराशाजनक अनुभव असल्‍याचे यावेळी त्‍यांनी सांगितले. 

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT