BARTI latest marathi news esakal
नाशिक

‘BARTI’च्या परीक्षेत प्रवेशपत्रावरून गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे)तर्फे रविवारी (ता. ३१) पाथर्डी फाटा येथील जी. डी. सावंत महाविद्यालयात झालेल्या परीक्षेदरम्यान प्रवेशपत्रावरून गोंधळ निर्माण झाला.

राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) विविध परीक्षांसाठी इच्छुक असलेल्या व या सेवेचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. (Confusion over admit card in BARTI exam nashik Latest Marathi News)

अनेक जिल्ह्यांतून आलेल्या काही विद्यार्थ्यांकडे परीक्षा प्रवेशपत्र (रिसीट) होते, तर काहींकडे नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. जे विद्यार्थी परीक्षेत पास होतात, त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना, लागणारे मार्गदर्शन, त्याप्रमाणे राहण्या-खाण्याची सोयही उपलब्ध करून दिली जाते.

त्यामुळे या परीक्षेला मोठे महत्त्व आहे. यावरूनच विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे ओळखपत्र नाही, त्यांना का प्रवेश, याबद्दल विचारणा केली असता, गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविला.

परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असे लक्षात आल्यावर परीक्षा केंद्राने इंदिरानगर पोलिसांना बोलावले. पोलिसांनी हस्तक्षेप करून गोंधळ थांबविला व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले.

दरम्यान, ज्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते, त्यांना आधीच मॅनेज करण्यात आल्याचा आरोपही काही विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे परीक्षेविषयी अनेकांच्या मनात साशंकता निर्माण झाली. प्राचार्या व्ही. डी. वानखेडे यांना विचारणा केली असता, कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

बाहेर जिल्ह्यातून आलेल्या परीक्षार्थींबरोबर पालकांमध्येही परीक्षेत सावळा गोंधळ असल्याची चर्चा सुरू होती. ओळखपत्र नसलेल्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी या पालकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT