crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : निलंबित तलाठ्यासह पत्नीचा सरकारवाडा पोलिसांत गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बेपत्ता निलंबित तलाठी परत आल्यानंतर त्यास जबाबासाठी बोलाविले असता, संबंधित दांपत्याने सरकारवाडा पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दांपत्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे. (Confusion with Sarkarwada police of wife with suspended talathi Nashik Latest Crime News)

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

निलंबित तलाठी हेमराज प्रकाश निकम व त्याची पत्नी सारिका हेमराज निकम यांनी मंगळवारी (ता. २९) दुपारी साडेबाराच्या सुमारास सरकारवाडा पोलिसांत गोंधळ घातला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमराज निकम हे बेपत्ता असल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली होती. हेमराज निकम हे घरी आल्यानंतर त्यांचा जबाब घेण्यासाठी तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू भोये यांनी त्यांना सरकारवाडा पोलिस ठाण्यात बोलविले.

मंगळवारी दुपारी निकम दांपत्य पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी जबाब नोंदविण्यास नकार दिला. निलंबनाची कारवाई चुकीची असल्याचा दावा करीत त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, दांपत्याने भोये यांच्यासह पोलिस ठाण्यातील महिला पोलिसांनाही शिवीगाळ करीत अंगावर धावून गेले. त्यामुळे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावल्याने दोघांची रवानगी कारागृहात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Pune Traffic : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; चारही महामार्ग जोडणारा ४५ किमीचा 'ट्विन टनेल' भूमिगत रस्ता प्रस्तावित

SCROLL FOR NEXT