wedding facebook live.jpg 
नाशिक

कॉंग्रेस नगरसेवकाचा फेसबुक लाईव्ह विवाह जोरात..५५ हजार पाहुणे अन्‌ अक्षताही ऑनलाइनच बरं का!  

रोशन खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सटाणा : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्याचा परिणाम जसा साऱ्या क्षेत्रावर झाला आहे, तसे काही सामाजिक बदलावरही झाला आहे. लग्न सोहळा हे त्यापैकीच एक आहे. संचारबंदीमुळे मोठे लग्न करण्यास बंदी असल्याने येथील युवा नगरसेवकाने आज मंगळवार (ता.५) रोजी फेसबुक लाईव्हद्वारे आपला विवाह अनोख्या पद्धतीने साजरा केला. विशेष म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून तब्बल पंचावन्न हजार पाहुणे व मित्रमंडळींनी जेथे आहे तेथे ऑनलाइन राहून हा विवाह सोहळा पाहिला आणि वधू-वरास शुभेच्छाही दिल्या.

तब्बल 55 हजार पाहुण्यांच्या पडल्या डोक्यावर अक्षता

सटाणा पालिकेतील निवृत्त वसूली निरीक्षक सुभाष पाटील यांचे चिरंजीव युवा नगरसेवक व कोंग्रेसचे नाशिक जिल्हा युवक कार्याध्यक्ष राहुल पाटील आणि धांद्री (ता.बागलाण) येथील ग्रामसेवक विनायक सूर्यवंशी यांची कन्या हर्षदा सूर्यवंशी यांचा गेल्या दोन महिन्यांपूर्वी बघण्याचा कार्यक्रम पार पडला होता. मात्र मार्च महिन्यात कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्याने देशात सर्वत्र लॉकडाऊन झाले. त्यामुळे विवाह सोहळा लांबणीवर पडला. नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने फिरू लागल्याने दोन्ही कुटुंबियांनी विवाह सोहळा लवकरात लवकर पार पाडण्याचे ठरविले. यावर विचार सुरू असतानाच राहुल पाटील यांना फेसबुक लाईव्हची संकल्पना सुचली. दोन्हीकडील नातेवाईकांनी यास त्वरित संमती दिली. पाहुणे आणि सर्व मित्रमंडळींना फेसबुक लाईव्हची कल्पना देऊन ऑनलाइन राहण्यास सांगितले. त्यानंतर आज अवघ्या २४ कुटुंबियांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी मंत्रोच्चारांत हा अनोखा विवाह पार पडला. पाहुणे आणि मित्रमंडळी असे मिळून जवळपास साठ हजार व्यक्तींनी हा विवाह सोहळा जेथे आहे तेथे ऑनलाइन राहून बघितला आणि वधूवरांना शुभाशिर्वादही दिले तर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. 

आगळ्यावेगळ्या विवाहाची सर्वत्र जोरदार चर्चा
दरम्यान, विवाह सोहळ्याआधी साखरपुडा संपन्न झाला. वधू हर्षदा ही औषधनिर्माण शाखेतील उच्चशिक्षित आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात अनेक डॉक्टर, नर्सेस, आरोग्य, स्वच्छता कर्मचारी आणि पोलिस बांधवांना संसर्ग झाला असून काहींना त्यात जीवही गमवावा लागला आहे. साखरपुड्यावेळी हर्षदाने ऍप्रॉन तर वर राहुलने खाकी रंगाचा शर्ट आणि मास्क परिधान करून त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली. या विवाह सोहळ्यासाठी पाटील आणि सूर्यवंशी परिवाराने आहेर स्वरुपात रक्कम न स्वीकारता ‘आपण घरीच राहा, सुरक्षित रहा’ हाच आमचा आहेर आहे, असा संदेशही दिला. या आगळ्यावेगळ्या विवाहाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. 

 मान्यवरांनी ऑनलाईन विवाहसोहळा बघून दिल्या शुभेच्छा...
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील, आमदार सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, आमदार कुणाल पाटील, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार राहुल आहेर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, जिल्हा परिषद सदस्य पप्पूतात्या बच्छाव, युवानेते अजय दराडे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांसह अनेक मान्यवरांनी फेसबुकद्वारे ऑनलाईन विवाहसोहळा बघून वधूवरांना शुभेच्छा दिल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC: अनपेक्षित निकाल! श्रीलंकन ढेपाळले, इंग्लडचा Super 8 मध्ये एकतर्फा विजय; पाकड्यांच्या मनात घबराट...

Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

Shikhar Dhawan चं दुसरं लग्न; रोहित शर्मा, चहलची उपस्थिती, तर विराट-रहाणेच्या कमेंटने वेधले लक्ष

SL vs ENG, T20 WC: W,W,W,W,W ! श्रीलंकेचा निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटू विल जॅक्सने वाढवली डोकेदुखी

Pune News: रुग्णांच्या जिवाशी खेळ, निकृष्ट औषधे वितरित; थेरगाव रुग्णालयातील प्रकार, तब्बल १६ हजार गोळ्यांची बॅच परत, चौकशीचे आदेश!

SCROLL FOR NEXT