Congress will contest Nashik Municipal Corporation elections on its own marathi news 
नाशिक

नाशिक महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळवर; पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

विक्रांत मते

नाशिक : मागील निवडणुकीत सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार पळवितानाच काँग्रेस उमेदवारांसमोर बंडखोर उभे करून आघाडी धर्माला हरताळ फासला. यंदाच्या निवडणुकीत तसे होणार नाही. काँग्रेस स्वबळावर महापालिकेच्या निवडणुका लढविणार, अशी घोषणा शनिवारी (ता. २६) पदाधिकाऱ्यांनी केली. 

काँग्रेसला संपविण्याची भाषा करणारेच संपले

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस कमिटीमध्ये नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आमदार सुधीर तांबे, हिरामण खोसकर, निरीक्षक योगेंद्र पाटील प्रमुख मार्गदर्शक होते. निरीक्षक पाटील म्हणाले, की काँग्रेस सर्वसामान्यांचा पक्ष आहे. आगामी काळात पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामास लागावे. आमदार तांबे म्हणाले, की कार्यकर्त्यांनी तळागळापर्यंत पोचून कामे करावी. आमदार खोसकर म्हणाले, की पक्षाचे काम प्रामाणिकपणे करावे. माजी नगरसेवक राजेंद्र बागूल यांनी काँग्रेसला संपविण्याची भाषा करणारेच संपल्याचे सांगितले. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वत्सला खैरे यांनी आगामी निवडणुकीत महिलांना अधिकाधिक संधी देण्याचे सांगितले. नगरसेवक राहुल दिवे यांनी तरुणांना राजकारणात अधिक संधी देणार असल्याचे सांगितले. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेविका आशा तडवी, हनिफ बशीर, सुरेश मारू, नीलेश खैरे, स्वप्नील पाटील, वसंत ठाकूर यांनी संबोधित केले. 

‘आघाडीचा धर्म पाळला नाही’ 

शहराध्यक्ष शरद आहेर म्हणाले, की गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पाडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने करतं आघाडीचा धर्म पाळला नाही. यंदा अधिकाधिक काँग्रेस उमेदवार निवडून आणण्यासाठी वर्षाआधीच सुरवात करू. प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी घरचा आहेर देत पक्षातील काही नेत्यांकडूनच हानी पोचविण्याचे काम होत असल्याचा आरोप केला. संघटना मजबूत करण्याचे आवाहन करताना महापालिकेच्या कामकाजावर टीका केली. महापालिकेतील काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी महापालिका ठेकेदार चालवत असल्याचा आरोप करत याविरोधात आंदोलन उभारणार असल्याचे सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

PCMC Traffic : खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका, रक्षक चौकातील रस्त्याचे डांबरीकरण; सकाळी-रात्री वाहतूक संथगतीने

Navratri Fasting Tips: नवरात्रात उपवास करताय? मग या गोष्टीची काळजी नक्की घ्या

SCROLL FOR NEXT