Nashik Municipal Corporation News esakal
नाशिक

NMC News : एक रुपयांत कामाची तयारी दाखविणारा कन्सल्टंट ‘नॉट रिचेबल’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या आयटी (IT) पार्कसाठी एक रुपया या नाममात्र दरात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबरोबरच कन्सल्टंट म्हणून काम करण्याची तयारी दाखविणाऱ्या हितेश शहा कंपनीने गाशा गुंडाळला आहे. (Consultant Hitesh Shah Company has wrapped up who work for one rupee for For Municipal IT Park nashik news)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे एक रुपयात काम करून देण्याची भूमिका स्वार्थासाठी असल्याची चर्चा सुरू आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना या सत्तेच्या कालावधीमध्ये आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क हे दोन प्रकल्प राबविण्यात आले.

या दोन्ही प्रकल्पांना मूर्त स्वरूप अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासाठी हे दोन्ही प्रकल्प डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. २०२२ व २३ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये बीओटीवर मिळकती विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातून २०० कोटी रुपयांची उत्पन्नदेखील गृहीत धरण्यात आले होते.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

मात्र प्रशासकीय कालावधीमध्ये आतबट्ट्याचा व्यवहार म्हणून सदरचा प्रकल्प गुंडाळला गेला. आयटी पार्कसाठी ठाणे येथील हितेश शहा कंपनीने एक रुपयात कन्सल्टिंग देण्याची तयारी केली होती.

वास्तविक एक रुपया नाममात्र दरात एखाद्या कंपनीने काम करण्याची दर्शविलेली तयारी संशयास्पद असतानादेखील त्या वेळी या संस्थेला काम देण्याची तयारी करण्यात आली. परंतु आयटी पार्कला चालना देत असतानाच ठाणे येथील कन्सल्टिंग कंपनीला संपर्क केला असता दाद मिळत नसल्याने एक रुपयात काम करण्याची तयारी दर्शविणारी कन्सल्टंट संस्थेची भूमिका संशयास्पद ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT