orange card holder2.png
orange card holder2.png 
नाशिक

दुकान व धान्याबाबतच्या तक्रारी आहेत? बिनधास्त हेल्पलाईन क्रमांक डायल करा!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रात केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी सवलतीच्या दराने धान्य वाटप सुरू झाले असून त्यानुसार शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणार आहे. सदर शिधापत्रकधारकांना धान्य घेण्यास कुठलाही अडथळा आल्यास नाशिक कार्यालयाकडून तक्रार निवारण केंद्र तक्रार करता येणे शक्य आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी परिपत्रकान्वये दिली आहे.

सवलतीच्या दरात वाटप सुरू

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील केशरी शिधापत्रिकाधारक ज्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षेत समावेश झालेला नाही, अशा लाभार्थ्यांना कोरोनाच्या अनुषंगाने घोषित केलेल्या टाळेबंदीच्या काळात मे व जुन 2020 करीता प्रति व्यक्ती 3 किलो गहु प्रति किलो 8/- रूपये व 2 किलो तांदूळ प्रति किलो 12/- रुपये अशा सवलतीच्या दरात वाटप सुरू करण्यात आलेले आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी परिपत्रकान्वये दिली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील धान्य वितरण अधिकारी, कार्यक्षेत्रात येणारे सर्व केशरी शिधापत्रिकाधारक यांनी याबाबत नोंद घ्यावी. सदर केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य घेण्यास कुठलाही अडथळा येऊ नये म्हणुन धान्य वितरण अधिकारी, नाशिक कार्यालयाकडून तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.

ज्या केशरी शिधापत्रिकाधारकांना दुकानाशी संबंधीत व धान्याशी संबंधीत अडचणी निर्माण होतील अशा सर्व नागरीकांनी खालील नमुद मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ए . वाय . येवले ( खैरनार ) (९९२२५८६६११), गणेश आव्हाड (९४०४६८८५७५ ) असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT