Jindal Accident esakal
नाशिक

Jindal Accident : जिंदाल कंपनी दुर्घटनेतील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक कार्यान्वित!

अरूण मलाणी

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मौजे मुंढेगाव शिवारात जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत 1 जानेवारी 2023 रोजी विस्फोट होवून आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेदरम्यान कंपनीतील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती तालुका आपत्ती नियंत्रण अधिकारी तथा इगतपुरी तहसिलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली आहे. (Contact number activated for information of missing employees in Jindal company accident nashik news)

जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत ज्या ठिकाणी आग लागल्याची दुर्घटना घडली आहे त्याभागातुन बचाव पथकामार्फत अडकलेल्या एकूण 19 व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपाचारार्थ नाशिक येथील सुयश हॉस्पिटल व ट्रोमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच जखमींपैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असून प्रकृती गंभीर असलेल्या 4 रूग्णांवर रूग्णालयामार्फत उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेदरम्यान कंपनीत उपस्थित असलेल्या परंतु अद्यापही संपर्क न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांनी संबंधित बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याच्या तपशिलासह इगतपुरी तहसिल कार्यालय 02553-2440009 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही तहसिलदार श्री.कासुळे यांनी कळविले आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

संपर्कासाठी कार्यान्वित करण्यात आलेले भ्रमणध्वनी क्रमांक

▪️ इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण : 8108851212

▪️ इगतपुरी तहसिलदार परमेश्वर कासुळे : 9604075535

▪️ निवासी नायब तहसिलदार प्रविण गोंडाळे : 9850440760

▪️ महसुल सहायक नितिन केंगले : 9767900769

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT