Senior leader Manikrao Shinde speaking at the peace committee meeting held in the background of Ganeshotsav and Eid esakal
नाशिक

Nashik News: सोशल मीडियात फॉरवर्ड करताना नियंत्रण ठेवा! : अनिकेत भारती

सकाळ वृत्तसेवा

येवला : येथील हिंदू-मुस्लिम बांधवातील सलोख्याची परंपरा कायम ठेवत गणेशोत्सव व ईद नेहमीप्रमाणे साजरी करा. पारंपरिक वाद्यांचा वापर करून लोकांना आवडेल, अशा मिरवणुका काढा, गणेशोत्सवात प्रबोधनपर सामाजिक देखावे सादर करून उत्साहात रंगत निर्माण करा.

एकोपा टिकवण्यासाठी सर्वांनीच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करून आलेल्या बातम्या फॉरवर्ड करण्यावर नियंत्रण ठेवा आणि काळजी घ्या, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी केले. (Control Forwarding on Social Media Aniket Bharti Nashik News)

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण शांततेत साजरे व्हावेत, यासाठी शहर व तालुक्यातील शांतता समिती सदस्य, पदाधिकारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी, ग्रामरक्षक दल, सर्व शासकीय विभागप्रमुखांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठकीत ते बोलत होते.

ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, संपर्क कार्यालयाचे बी. आर. लोंढे, युवा नेते मकरंद सोनवणे, किशोर सोनावणे, शहर काझी सलीमुद्दिन, पोलिस उपअधीक्षक सोहेल शेख, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे आदींची उपस्थिती होती.

विसर्जन, मिरवणुका, बंदोबस्त तयारी करण्यासह वीजपुरवठ्याबाबत श्री. भारती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श असल्याचे सांगितले.

गणेशोत्सव व ईद सण दोन्ही समाजाने जल्लोषात साजरे करावेत. शक्य असल्यास ईदची मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढावी, असे आवाहन शिंदे यांनी केले. मी मागील ३५ वर्षांत कायमच हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपलेला सलोखा पाहत आलो आहे.

किंबहुना नवी पिढीही सलोखा पुढे टिकवत असल्याने दोनही सण जल्लोषात साजरे होतील, असा विश्वास कुणाल दराडे यांनी व्यक्त केला.

दोन्ही सण एकत्र येत असले, तरी दोघांच्याही परंपरेचा आदर केला जाईल किंबहुना मुस्लिम समाजाकडून दरवर्षी होणाऱ्या गणेश मंडळांच्या अध्यक्षांच्या गौरवाची परंपराही जपली जाईल, असे काझी सलीमुद्दीन यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहरातील मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, लोंबकळणाऱ्या तारा व्यवस्थित कराव्यात व अडथळे दूर करून मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, मर्चंट बँकेचे संचालक प्रमोद सस्कर आदींनी केले.

येथील विसर्जन मिरवणुकीतील कसरती, मानाची परंपरा, मल्लखांब आदर्शवत असून, दोन्ही सण जल्लोषात व एकोप्याने साजरे होतील, असे प्रांताधिकारी गाढवे म्हणाले. सामाजिक देखावे सादर करा, वादग्रस्त देखावे अजिबात करू नका, देखाव्यांच्या ठिकाणी स्वयंसेवकांची नेमणूक करा, अशा सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख यांनी केल्या.

मध्यवर्ती गणेश मंडळाच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन किशोर सोनवणे यांनी केले, तर ग्रामीण भागातील एकोपा कौतुकास्पद असून, अधिकाधिक गावात ‘एक गाव- एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येईल, असे महेंद्रकुमार काले यांनी सांगितले.

ॲड. शैलेश भावसार, ॲड. शेख, अतिक गाझी, ए. ए. शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी प्रास्ताविक केले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. भूषण शिनकर यांनी सूत्रसंचालन केले. शहर पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी आभार मानले.

उपमुख्याधिकारी रोहित पगार, नायब तहसीलदार रंजना पराते, शिवसेना नेते राजेंद्र लोणारी, भाजप नेते आनंद शिंदे, तरंग पटेल, योगेश सोनवणे, एजाज शेख, अतुल घटे, हुसेन शेख, अलकेश कासलीवाल, जयवंत खांबेकर, विजय गोसावी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT