dalimb.jpg 
नाशिक

शेतकऱ्यांना दिलासा! गारव्यामुळे डाळिंबावरील तेल्या नियंत्रणात; प्लेगचे प्रमाणही घटले

गोकुळ खैरनार

नाशिक : (मालेगाव) पाच वर्षांपासून बेपत्ता डाळिंबावरील तेल्या रोग अलीकडच्या काळात काही प्रमाणात दिसू लागल्याने उत्तर महाराष्ट्रातील किमान दहा टक्के क्षेत्र बाधित झाले होते. मात्र दोन महिन्यांपासून वेळोवेळी निर्माण होणाऱ्या दमट वातावरणामुळे दमदार पाऊस पडत आहे. पावसानंतर हवेत गारवा निर्माण होऊन तेल्याचा बीमोड होण्यास मदत झाली आहे. तसेच प्लेग या रोगाचे प्रमाणही घटत आहे. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

वातावरण थंड झाल्याचा फायदा 

तेल्या व मर रोगामुळे नाशिक जिल्ह्यातील विशेषत: कसमादे पट्ट्यातील डाळिंबाचे पीक संकटात आले होते. रोगामुळे पीक निम्म्यावर आले होते. तेल्या हद्दपार झाल्याने दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यातील डाळिंबाचे क्षेत्र जवळपास दहा हजार हेक्टरने वाढले. नगदी पीक म्हणून डाळिंबाकडे पाहिले जाते. शेतकरी पुन्हा डाळिंबाच्या प्रेमात पडला असतानाच तेल्याचा शिरकाव झाला. यावेळी रोगाचा प्रादुर्भाव खूपच कमी होता. जेमतेम दहा टक्के पिकावर त्यातच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये छाटणी करण्यात येणाऱ्या बागांवर त्याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. मात्र डाळिंब उत्पादकांच्या सुदैवाने सध्या वातावरण थंड झाल्याचा फायदा होत आहे. 

डाळिंबाचे क्षेत्र 

उत्तर महाराष्ट्र- ४२ हजार हेक्टर 
नाशिक जिल्हा- ३५ हजार हेक्टर 
तेल्या रोगबाधित क्षेत्र- अंदाजे तीन ते चार हजार हेक्टर 

तेल्या रोगाचा प्रादुर्भाव डाळिंबावर आढळल्यास शेतकऱ्यांनी तातडीने रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या फांद्या, फळे यांचा नायनाट करावा. जेणेकरून रोग पसरणार नाही. शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. - दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव 

विषम हवामानामुळे तेल्याचा प्रसार सुरू झाला होता. उष्ण व दमट हवामानात तो काहीसा वाढला. हवेत गारवा निर्माण झाल्यानंतर तो आपोआप नियंत्रणात येत आहे. शेतकरी डाळिंब लागवडीकडे वळले असून, रोगाबाबत काळजी घेणे आवश्‍यक आहे. - अरुण देवरे उपाध्यक्ष, महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ  

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT