Maharashtra Police Academy  esakal
नाशिक

नाशिक : पोलिस अकादमीत येत्या शुक्रवारी दीक्षान्त सोहळा

नरेश हळणोर

नाशिक : त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीत (Maharashtra Police Academy) प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या (PSI) १२१ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा (Convocation Ceremony) शुक्रवारी (ता. १७) होणार आहे. (Convocation ceremony at Maharashtra Police Academy next Friday Nashik News)

पोलिस महासंचालक रजनीश सेठ प्रमुख पाहुणे असतील. राज्याचे अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजयकुमार यांची प्रमुख उपस्थिती राहील. दीक्षान्त सोहळ्यास शुक्रवारी सकाळी आठला महाराष्ट्र पोलिस अकादमीतील कवायत मैदानावर प्रारंभ होईल. प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या १२१ व्या तुकडीतील १६० पुरुष व ११ महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. त्यातील ६८ टक्के प्रशिक्षणार्थी पदवीधर व पदव्युत्तर असून, २ ऑगस्ट २०२१ पासून या तुकडीचे प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा, स्थानिक व विशेष कायदे, फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राइम, गुन्हेगारी शास्त्र, कवायत, शस्त्र कवायत, शारिरीक प्रशिक्षण, गोळीबार, योग आदी विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. सकाळी आठला संचलनास सुरवात होणार आहे. दीक्षान्त सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन अकादमीच्या संचालकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT