suraj mandre
suraj mandre 
नाशिक

अवैध धंद्यांना लागणार लगाम! जिल्हा समन्वय कक्षात आता थेट तक्रारीची सोय

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्याविरोधात थेट तक्रारीसाठी जिल्हा समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

थेट तक्रार करता येणार

नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या या समन्वय कक्षाचा क्रमांक 09405869940 हा असून ई मेल आय डी nashikhb123@gmail.com हा आहे. दिलेल्या क्रमांकावर केवळ अवैध धंद्यांच्याच तक्रारी स्वीकारल्या जाणार आहे. नागरिकांना जिल्ह्यात काही अवैध घटनाची माहितीसाठी या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. तक्रार करताना घटना कोठे, कधी, काय याचा तपशील द्यावा, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी केलेले आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनातील सर्व विभागांची समन्वय बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असून या समन्वय कक्षमार्फत सर्व विभागांत समन्वय साधला जाणार आहे.

या कक्षाचे प्रमुख समनव्यक म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे असतील. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार, सहायक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधिक्षक बिसन भूतकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक के.एम.वीरकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, अन्न व औषध निरीक्षक चंद्रकांत मोरे, अमित रासकर हे या समन्वय कक्षाचे सदस्य असतील.


या कक्षात नागरिकांकडून आलेल्या केवळ अवैध धंद्यांबाबतच्याच तक्रारी नोंदवले जातील आणि संबंधित विभागाच्या ई-मेलवर तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार तात्काळ कार्यवाहीसाठी पाठविली जाईल. संबंधित विभाग दिलेल्या काळात त्या तक्रारींवर कार्यवाही करून समन्वय कक्षाच्या ई मेल वर कार्यपूर्ती अहवाल पाठवतील. -सूरज मांढरे जिल्हाधिकारी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT