malegaon.jpg 
नाशिक

चिंता वाढली! मालेगाव शहर कनेक्शनमुळे तालुक्यात कोरोनाने पसरले पाय; ६३ गावांत सर्वाधिक रुग्ण

प्रमोद सावंत

नाशिक : शहरातील पूर्व-पश्‍चिम भागासह तालुक्यातील ६३ गावांत कोरोनाने पाय पसरले आहेत. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पावणेसातशे झाली असून, पावणेदोनशे ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, पावणेतीनशे संशयित रुग्ण आहेत. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या २३ आहे. 

दाभाडीत सर्वाधिक ८० रुग्ण

रावळगाव, झोडगेसह प्रामुख्याने शहरानजीकची गावे कोरोनाने कवेत घेतली. दाभाडी, वडेल, खाकुर्डी, पाटणे, येसगाव, चंदनपुरी, अजंग, नगाव येथील रुग्णांची संख्या यामुळेच सर्वाधिक आहे. शहराशी आलेल्या संबंधातून कोरोनाने तालुक्यात पाय पसरले. एका रुग्णामुळे अनेक कुटुंबांना कोरोनाची लागण झाली. तालुक्यातील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्याही तीनशेहून अधिक आहे. दाभाडीत सर्वाधिक ८० रुग्ण सापडले. शहरानजीकची गावे प्रभावित झाली. शहरातील पूर्व-पश्‍चिम भागात रुग्णसंख्या वाढताच ग्रामीण आरोग्य यंत्रणा सजग झाली. घरोघरी जाऊन तपासणी व उपचार केल्याने रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यात तालुका आरोग्य विभागाला यश मिळाले. प्रारंभीच्या काळात ग्रामस्थांनी प्रशासनाला मोठे सहकार्य केले. ५० पेक्षा अधिक गावांनी स्वत:हूनच नियमावली तयार केली. स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवले. 

तालुक्यातील रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

तालुक्यातील आठवडेबाजार अद्यापही सुरू झालेले नाहीत. अनेक गावांनी बाहेरून येणाऱ्या नातेवाईक व शहरातून येणाऱ्यांना बंदी केली. त्याचा चांगला परिणाम होऊन तालुक्यातील लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या मर्यादित आहे. तालुक्यातील रुग्णांवर झोडगे व दाभाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील सोयी-सुविधांबद्दल रुग्ण समाधानी आहेत. एखादा अपवाद वगळता स्वत: रुग्णांच्या फारशा तक्रारी नव्हत्या. येथे रुग्णसंख्या वाढल्यानंतर होणाऱ्या आढावा बैठकीत तालुका आरोग्याधिकारी डॉ. शैलेश निकम व अन्य सहकारी सहभागी होत. यामुळे रुग्ण आढळताच त्यांनी प्रभावी उपाययोजना केल्या. 

बागायती विभागांत शिरकाव

पुणे, नाशिक व अन्य शहरांतून नोकरदार गावी आल्यानंतरही त्यांच्यावर यंत्रणेचे लक्ष होते. प्रत्येकाच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला. शासन व आरोग्य विभागाच्या प्रतिबंधांचे ग्रामीण भागात तंतोतंत पालन झाले. १५ गावे वगळता अन्यत्र रुग्णसंख्या एकआकडीच राहिली. तथापि, कोरोनाने तालुक्यातील काटवन, माळमाथा, निमगाव व बागायती अशा सर्वच विभागांत शिरकाव केला आहे. 

कोरोनाबळींची गावनिहाय संख्या 

रावळगाव (४), वडगाव (३), वडेल (२), पाटणे (२), वजीरखेडे, टोकडे, झोडगा, नगाव, चिंचावड, कौळाणे, अस्ताणे, येसगाव, मळगाव, अजंग, दाभाडी, येसगाव खुर्द (प्रत्येकी एक). 

कोरोना रुग्णसंख्येने प्रभावित गावे व रुग्णसंख्या 

दाभाडी (८०), वडेल (६५), रावळगाव (६२), झोडगे (४८), खाकुर्डी (३०), पाटणे (२६), येसगाव खुर्द (२६), अजंग (२५), चंदनपुरी (२५), नगाव (१३), निमगाव (१५), सौंदाणे (११), लखाणे (११), वडगाव (१०), भिलकोट (१०) 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak: 'तो' पेपर फुटलाच नव्हता? तक्रारच बनावट? तक्रारदाराने 'ई-मेल'मध्ये काय म्हटलंय?

Manoj Jarange: मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा सुरू होणार? २९ जुलैला मनोज जरांगे काय घोषणा करणार? आंदोलनाच्या पुढील दिशेवर निर्णय लवकरच

Latest Marathi News Live Update: दिल्लीचे कडकडडूमा न्यायालय ३१ जुलै रोजी ताहिर हुसेन आणि इतर दोषींना शिक्षा सुनावणार

Heritage Alert: टाकळी राजेरायची ऐतिहासिक वेशी ढासळली; प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर

Pandharpur Ashadhi Wari AI count : आषाढी वारीत पंढरपुरात विक्रमी 32 लाख भाविक; एआय तंत्रज्ञानातून अचूक मोजणी, दुबार नोंदणीला आळा

SCROLL FOR NEXT