mayor.jpeg 
नाशिक

घंटागाडीद्वारे कोरोना बेड, ऑक्सिजनची माहिती द्या; महापौरांच्या विभागप्रमुखांना सूचना

विक्रांत मते

नाशिक : शहरात फलक उभारण्याबरोबरच घंटागाडीद्वारे कोरोनाबाधित रुग्णांसाठी खासगी व शासकीय रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची माहिती वेळेवर उपलब्ध व्हावी, यासाठी वैद्यकीय विभागाकडून दररोज माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी शनिवारी (ता. ५) सूचना दिल्या. 

१५ व्हेंटिलेटर वापराअभावी पडून 

महापालिकेच्या नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर वापराअभावी पडून असल्याची माहिती समोर आल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी शनिवारी वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेताना अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तांत्रिक बाबींची पूर्तता करून व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सुविधांअभावी कोरोनाबळींचा आकडा वाढत असताना पीएम केअर फंडातून महापालिकेला प्राप्त झालेले १५ व्हेंटिलेटर्स नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात पडून असल्याची माहिती समोर आली आहे. व्हेंटिलेटर्सच्या वॉर्डकरिता २३ किलोलीटरचे ऑक्सिजनचे सिलिंडर प्राप्त होत नसल्याने हे व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 

महापौरांच्या विभागप्रमुखांना सूचना 

हा प्रकार उघड झाल्यानंतर महापौर कुलकर्णी यांनी वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांना जाब विचारला. संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारण पुढे केल्यानंतर सदर बाबींची तत्काळ पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. शहरात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने असलेले हॉस्पिटल व त्यामधील सेवासुविधा, तसेच दाखल होणारे रुग्ण यांच्याकरिता आवश्यक असलेले ऑक्सिजन, तसेच व्हेंटिलेटरचे बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा कसे, याची माहिती त्यांनी घेतली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त (सेवा) प्रवीण अष्टीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे, डॉ. त्र्यंबके, डॉ. शेटे उपस्थित होते. 

१५ सप्टेंबरला महासभा 

उपमहापौर भिकूबाई बागूल यांच्या कोरोना विषयावर विशेष महासभा घेण्याच्या दोन पत्रांना महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रतिसाद दिला असला तरी येत्या १५ सप्टेंबरला होणारी महासभा नियमित असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना संदर्भात जो काही विषय होईल तो याच महासभेत होईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान, माजी नगरसेवक प्रकाश बोराडे व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे श्रद्धांजली अर्पण करून महासभा तहकूब केली जाणार आहे.  

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT