gondhal.jpg
gondhal.jpg 
नाशिक

काय सांगू बाबा..कोरोनाने घातला असा गोंधळ....की आमचा गोंधळ राहूनच गेला...वाघ्या-मुरळीची व्यथा!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (दिक्षी) कोरोनाच्या भीतीने शॉर्टकट लग्नाचा ट्रेंड आला खरा...पण या विवाहासारख्या शुभकार्यात जागरण - गोंधळाची परंपरा जोपासणाऱ्या वाघ्या-मुरळी कलावंतांवर मात्र बिकट परिस्थिती आलीय..हातच काम बंद झाल्याने खायचं काय?...अन् जगायचं कसं हा गहन प्रश्नच त्याच्यासमोर उभा ठाकला आहे.

कोरोनाने त्यांचा रोजगारच हिरावला...

कोरोनामुळे लग्नसमारंभच रद्द झाल्याने हे लोककलावंत मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. विवाहानंतर कुलदेवतेचे स्मरण व्हावे, यासाठी जागरण-गोंधळ घातला जातो, यासाठी वाघ्या-मुरळी या लोककलावंतांना बोलवले जाते. जागरण- गोंधळातील हे कलावंत आपली कला सादर करत एका कार्यक्रमाचे सुमारे पाच हजारांपुढे पैसे घेतात. लग्नसराईत हे कलावंत खूप व्यस्त असतात. कारण वर्षभरातील मोजकेच दिवस त्यांच्याकडे असतात. मात्र यंदा कोरोनाने सर्वच विवाहसोहळे अनेकांनी पुढे ढकलले, तर काहींनी अवघ्या दहा ते पंधरा जणांच्या उपस्थितीत विवाह उरकून घेतला. यामुळे या कलांवतांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील गावात अशा कलावंतांचा गट आहे. मात्र कोरोनाने त्यांचा रोजगारच हिरावल्याने या कलावंतांना काम मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे अशा कलावंतांना मानधन द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. 

कोरोनामुळे धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने शुभकार्यात जागरण- गोंधळ करणाऱ्या कलावंतांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने मानधन देऊन मदत करावी. - दौलत चौधरी (सदस्य, अखिल भारतीय गोंधळी व वाघे मुरळी संघटना, पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT