dadaji chavan esakal
नाशिक

ग्रेट दादाजी! HRCT स्कोर 22, ऑक्सिजन लेव्हल 45 पुढे हरला कोविड

सुदाम गाडेकर

नगरसूल (जि.नाशिक) : येथील ग्रामीण रुग्णालयात (civil hospital) उपचार (treatment) घेऊन दादाजी चव्हाण या साठीतील गृहस्थांनी कोरोनाला हरवले. त्यांचा एचआरसीटी (HRCT) स्कोर २२ होता, तर ऑक्सिजन लेव्हल (oxygen level) ४५ पर्यंत घसरली होती. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनी घेतलेली मेहनत आणि दादाजी चव्हाण यांची जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती व दुर्दम्य विश्‍वास यामुळे ३८ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (fight with corona) मिळाला. कशी केली कोरोनावर मात?

दादाजींसाठी सर्वांचा जीव टांगणीला लागला होता.

आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या दादाजी चव्हाण यांनी ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून रुग्णालयात रुग्णसेवा प्रामाणिकपणे बजावत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली. नगरसूल ग्रामीण रुग्णालयातच त्यांना १४ दिवसांनंतर अत्यवस्थ स्थितीत दाखल करण्यात आले. एचआरसीटी स्कोर २२ व ऑक्सिजन लेव्हल ४५ पर्यंत घसरल्याने त्यांची स्थिती नाजूक बनली होती. त्यामुळे येथील ग्रामस्थांसह रुग्णालय कर्मचारीही चिंतेत होते. प्रेमळ व दिलदार स्वभाव असलेल्या दादाजींसाठी सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. येथील रुग्णालयात उपचारासाठी कार्यरत असलेले डॉ. सतीश सूर्यवंशी, डॉ. जितेंद्र डोंगरे, डॉ. पार्श्‍व पटणी, डॉ. वसंत जाधव, डॉ. राकेश गावित, डॉ. सीमा सोनवणे, सतीश डोंगरे, मुख्यपरिचारिका मीरा खेडकर, अनिता निकम, अनिता शिंदे, मनीषा पाटील, सुरेखा येरोला, प्रतिभा चव्हाण, शबाना शेख, रिना वडांगळे यांचे अथक परिश्रम व दादाजी चव्हाण यांचा जगण्याचा दुर्दम्य विश्‍वास यामुळे तब्बल ३८ दिवस कोरोनाशी झुंज देऊन त्यांनी नवजीवनास प्रारंभ केला आहे. शनिवारी रुग्णालयातून बरे होऊन परततांना कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

सेवा बजावत असतानाच कोरोना संसर्ग झाला. नगरसूल ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व ग्रामस्थांचे प्रेम व पाठबळ यामुळे आत्मविश्‍वास वाढला. मी कोरोनावर मात केली. - दादाजी चव्हाण, नगरसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Market Yard : भाजीपाला व्यापारी व सभापती यांच्यात जोरदार वाद, कोल्हापूर बाजार समितीमध्ये प्रकार; नेमकं काय प्रकरण?

Pro Kabaddi 12: यू मुंबावर युपी योद्धाज पडले भारी! पराभवामुळे टॉप-४ ची संधीही हुकली

Ayurvedic Tips for Heart: हृदयविकाराचा झटका येऊच नये यासाठी काय करावे? वाचा आयुर्वेद काय सांगत

Mumbai News: तिसऱ्या मुंबईसाठी सिडकोसारखे धोरण! बाधितांना मोबदल्यात भूखंडही देणार

Video : अर्जुन करणार सायलीच्या आई - वडिलांची डीएनए टेस्ट ! "अरे इतका स्लो वकील कसा असू शकतो ?" प्रेक्षक भडकले

SCROLL FOR NEXT