ganesh-idol.jpg 
नाशिक

यंदा गणेश मुर्ती बुकींगचे प्रमाण निम्म्याने घटले; मात्र किंमतीत वाढ

युनूस शेख : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (जुने नाशिक) गणेशोत्सव महिन्यावर येऊन ठेपला असला तरी मात्र, मूर्ती साकारण्याच्या काम मंदावले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम झाल्याने मूर्ती बुकींग करण्याचे प्रमाणही निम्म्याने घटले आहे. तसेच मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत ५० टक्के वाढ झाली असल्याची माहिती मूर्तीकाराने दिली. 

गणेश मुर्ती बुकींग निम्म्याने घटले

गणेशोत्सव म्हटला की, सर्वांमध्ये मोठा उत्साह संचारत असतो. महिन्याभर अगोदरपासून मूर्ती बुकींग करणे, सर्वाजनिक मंडळांकडून वर्गणी गोळा करणे, आरास उभारण्यासाठी जागेची निश्‍चिती करणे, आवश्‍यक परवानगी जमा करण्यासारखी कामे सुरु होत असतात. घरोघरीही गणपतीची स्थापना होत असल्याने नागरीक त्यांना हवी असलेली मूर्ती बुकींग करत असतात. यंदा सर्वच सणसणावलीवर कोरोनाचा परिणाम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी होता काम नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सार्वजनिक मंडळासह घरगुती उत्सव साजरा कऱणाऱ्यामध्ये उत्साह दिसून येत नाही. अशा प्रकारची मूर्ती हवी, उंची इतकी असावी. अशा विविध प्रकारच्या सुचना करत मूर्ती बुकींग करुन ठेवण्याचे काम दिड ते दोन महिना अगोदरपासून सुरु असते. 

मूर्ती साकारण्याचे काम मंद गतीने सुरु

यावर्षी अतापर्यंत केवळ तीस टक्के बुकींग झाली आहे. दरवर्षी ७० ते ८० बुकींग आतापर्यंत होत असत. पंधरा एक दिवसानंतर आणखी १० ते २० टक्के बुकींग होण्याची शक्यता मूर्तीकाराने व्यक्त केली आहे. लहान मूर्ती स्थापना करण्याच्या सुचना असल्याने आतापर्यंत केवळ दोन ते अडीच फुटाचीच मूर्ती तयार करण्यात आली आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे कारागीरही त्यांच्या गावी परतले असल्याने मूर्ती साकारण्याचे कामही मंद गतीने सुरु आहे. कुटूंबीयांच्या मदतीने कामे पूर्ण केली जात आहे. 

मूर्तीच्या दरात वाढ 

गणेशोत्सव ऑगस्ट महिन्यात येत असला तरी मार्च, एप्रिलपासूनच मूर्ती साकारण्याचे काम सुरु होत असते. यंदा याच दोन महिन्यात सर्वत्र कडक लॉकडाऊन होता. रंग, प्लास्टर ऑफ पेरिस अशा विविध प्रकारचा कच्चा माल मिळत नव्हता. साठा असलेल्यानी चढ्या दराने माल विक्री केला. मूर्तीकारांनाही जादा दराने माल खरेदी करावा लागला. सुमारे ५० टक्के कच्च्या  मालात वाढ झाली. त्यामुळे मूर्तीच्या किमतींमध्ये १५ टक्के वाढ झाली आहे. अशा या सर्व परिस्थीमुळे यावर्षी बाजारात केवळ ३० ते ४० टक्के गणेशमूर्ती विक्रीस येण्याची शक्यताही मूर्तीकारानी व्यक्त केली. 

लॉकडाऊनमुळे दिनचर्याच बदलून गेली आहे. गणेशोत्सव येऊन ठेपला, तरी नागरिकांमध्ये हवा तसा उत्साह दिसत नाही. कच्या मालाच्या किंमती वाढल्या. कारागिरांची अडचण अशा विविध प्रकारच्या अडचणीना सामोरे जावे लागत आहे. - संजय परदेशी (मूर्तीकार)  

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT