Corona has led to an increase in the migration of tribals nashik marathi news 
नाशिक

कोरोनामुळे वाढले पश्चिम पट्ट्यातील आदिवासींचे स्थलांतर; शहरात मजुरीकडे कल 

राम खुर्दळ

गिरणारे/गंगापूर : कोरोना महामारीत मार्चपासून गाव-पाड्यावर गेलेले आदिवासी नागरिक रोजगारासाठी ऑक्टोबरपासूनच लाकूडफाटा, साधने घेऊन कुटुंबासह गिरणारे, गंगापूर नाका, सातपूर व उपनगरांत रोजगारासाठी येत आहेत. आजपर्यंत हजारो आदिवासी मजुरीसाठी गाव सोडून बाहेरगावी गेल्याने कित्येक गावांत वयस्कर मंडळी व लहान मुलेच आढळतात.

रोजगारासाठीच हे स्थलांतर यंदा मोठ्या प्रमाणात आहे. रोजगार हमी कायद्याबाबत ग्रामपंचायती उदासीन असल्याने व लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या अनास्थेमुळे स्थलांतर यंदाही वाढले आहे. 

पदवीधर असलेली शिकलेली मुलांचाही  समावेश

नाशिक तालुक्याचा आदिवासी बहुल पश्चिम भाग, तसेच हरसूल, ठाणापाडा, खरशेत, वाडा, पळसन, आडगाव, देवळा ते थेट गुजरात सीमेवरून मोठ्या प्रमाणात कित्येक कुटुंबे रोजगारासाठी गावे सोडून गेले आहेत. गावात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा अभाव, स्थानिक रोजगार देणाऱ्या व्यवस्थांची उदासीनता यामुळे पदवीधर शिकलेली मुले, आठ ते १५ वयोगटांतील मुले, मुली, महिला, पुरुष रोजगारासाठी गावे सोडून जातात. पावसाळ्यात भात, नागली पिके काढल्यावर हे आदिवासी कुटुंबासह उपनगरात जाऊन टोमॅटो काढणी, फवारणी, मशागत, द्राक्ष छाटणी, डिपिंग, काढणी, पॅकिंग अशी कामे शेतकऱ्यांकडून घेतात. काही स्थानिक मजुरांचे ठेकेदार कामे ठरवून मजूर पुरवतात. या वर्षी हातात कामे नसल्याने नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील असंख्य कुटुंबे रोजगारासाठी बाहेर पडली आहेत, हे चक्र मेपर्यंत असेल. 

 

आम्ही दर वर्षी पोटापाण्यासाठी नाशिक, सिन्नर, दिंडोरी, निफाड तालुक्यांत शेतमजुरीस जातो. पावसाळ्यातील सोंगणी आटोपून आम्ही गिरणारेच्या मजूर बाजारात जातो. एक जीप त्यात कोंबलेले ४० हून अधिक प्रवासी, असेच गिरणारे किंवा नाशिक गाठतो. मजूर बाजारात रस्त्यावर उघड्यावर जिथे जागा मिळेल तिथे उभे राहतो
-हिरामण रिंजड, शेतमजूर, गावंध 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी; तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Maratha Reservation: समाजापासून मला दूर ठेवण्याचा सरकारचा कट; माढ्यातील इशारा सभेत मनोज जरांगे यांचा आरोप, आरक्षणाचा लढा सुरूच राहणार

अर्थभान : इमर्जिंग अर्थव्यवस्थांमध्ये भारत अव्वल

शाळांना यंदा ११ दिवस दिवाळी सुट्टी! शैक्षणिक वर्षात २३७ दिवस अध्यापनाचे अन्‌ शिक्षकांना १२८ दिवस सुट्ट्या; यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर, वाचा...

Jharkhand Protest: झारखंडमध्ये भरती परीक्षांवरून आंदोलन पेटले; विद्यार्थी संघटना सीबीआय चौकशीच्या मागणीवर ठाम

SCROLL FOR NEXT