chhagan bhujbal234.jpg 
नाशिक

पत्रकारांची होणार कोरोना तपासणी - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून राज्यातील जनतेला कोरोनाशी संबंधित बातम्या देणाऱ्या मुंबईतील पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी फिल्डवर काम करणाऱ्या नाशिकमधील पत्रकारांचीही तातडीने तपासणी करण्यासाठी शिबिर घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहेत. मंगळवारी (ता. 21) भुजबळ यांनी जिल्हाधिकारी मांढरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत तपासणी शिबिर घेण्यास सांगितले. 

तातडीने विशेष तपासणी शिबिर घेऊन तपासणी
मुंबईतील पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर यांची राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेतर्फे कोरोनाची चाचणी घेतली. विविध माध्यमांत कार्यरत 167 पत्रकारांची गेल्या गुरुवारी कोरोना चाचणी झाली. त्यातील 53 पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्याच पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये फिल्डवर काम करणारे पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर यांच्यासाठी तातडीने विशेष तपासणी शिबिर घेऊन सर्वांची तपासणी करावी, अशा सूचना भुजबळ यांनी जिल्हाधिकारी मांढरे यांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांचा उंबरखिंडीत लढतानाचा AI व्हिडिओ व्हायरल! फक्त ४ तासांत इतिहास उलटला, २५ हजार मुघल गारद

"मेरे लाईफ में हिरो की एंट्री हो गयी है"; तुला पाहते रे फेम गायत्री दातारच्या आयुष्यात खऱ्या विक्रम सरंजामेची एंट्री !

Maharashtra Politics : पुढील दोन महिन्यांत मोठा राजकीय बदल; एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील - ॲड. प्रकाश आंबेडकर!

AI and Jobs : ‘एआय’ नोकऱ्या संपवणार? जाणून घ्या, ‘RBI’चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काय दिलंय उत्तर

Latest Marathi News Live Update: सातारा बामणोलीत ड्रग्ज छापा

SCROLL FOR NEXT