corona patient 123.jpg 
नाशिक

दिलासादायक! कोरोनाबाधित उपचारानंतर दहाव्या दिवशी मिळणार "डिस्चार्ज'..पण...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना यापुढे दहाव्या दिवशी डिस्चार्ज करण्यासंदर्भातील नवीन आदेश राज्यशासनाने दिले आहेत. केंद्राच्या नव्याने आलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार हे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे कोरोनाची लागण असलेल्या प्रत्येक रुग्णाला 14 दिवस आणि त्यानंतरही त्यांचे दोन स्वॅबचे रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत रुग्णालयामध्ये राहण्याची आवश्‍यकता राहणार नाही. सौम्य आणि मध्यम स्वरुपाच्या कोरोनाबाधितांचे दुसऱ्यांदा स्वॅब घेतले जाणार नाहीत. तसेच दहा दिवसांनंतर डिस्चार्ज दिल्यानंतर या रुग्णांनी सात दिवस घरात क्वारंटाईन राहावयाचे असून त्यावर आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. या निर्णयामुळे कोरोना रुग्णांविषयीची जी भिती समाजात विनाकारण निर्माण झाली होती ती नाहीशी होण्यास मदत होणार आहे. 

केंद्राच्या नवीन सूचना : गंभीर रुग्ण वगळता दुसऱ्यांदा स्वॅब नाही
केंद्र शासनाने कोरोनाबाधित रुग्णांच्या डिस्चार्जसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून, त्यानुसार राज्यशासनाचे आरोग्य विभागाला आदेश दिले आहेत. त्यानुसार, कोरोनाबाधित लक्षणे नसलेला, मध्यम लक्षणे आणि गंभीर रुग्णांना उपचारादरम्यान 14 दिवसांऐवजी 10 दिवस उपचारासाठी रुग्णालयात राहावे लागणार आहे. विशेषत: यातील पहिल्या दोन प्रकारातील रुग्णांची दुसऱ्यांना कोरोनाची चाचणीला सामोरे जावे लागणार नाही. तसेच, ज्या रुग्णांचा उपचारानंतर 7व्या ते 9व्या दिवसापर्यंत औषधांशिवाय ताप नसणे, ऑक्‍सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण 95 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आवश्‍यक आहे. उपचारानंतरही सात दिवस होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. मात्र त्यानंतरही लक्षणे आढळून आल्यास पुन्हा कोरोना कक्षात दाखल केले जाणार आहे. 

कोरोनाबाधितांसाठीची नवीन डिस्चार्ज पॉलिसी 
* अतिसौम्य, सौम्य वा लक्षणे नसलेले कोरोनाबाधित : 
1) रुग्ण दाखल झाल्यानंतर दिवसातून दोन वेळा ताप व पल्सची तपासणी 
2) 7व्या, 8व्या, 9व्या दिवशी ताप नसल्यास 10 व्या दिवशी डिस्चार्ज करणे 
3) या रुग्णास डिस्चार्ज करताना दुसऱ्या स्वॅब चाचणीची आवश्‍यकता नाही 
4) डिस्चार्ज केल्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक 

* मध्यम लक्षणे असलेला कोरोनाबाधित : 
1) रुग्ण दाखल झाल्यानंतर दिवसातून दोन वेळा ताप व पल्सची तपासणी 
2) पहिल्या तीन दिवसाच्या उपचारानंतर ताप कमी झाला आणि चौथ्या दिवशी ऑक्‍सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण 95 टक्केपेक्षा अधिक, अशा रुग्णास दहाव्या दिवशी डिस्चार्ज करणे 
3) या रुग्णास डिस्चार्ज करताना दुसऱ्या स्वॅब चाचणीची आवश्‍यकता नाही 
4) डिस्चार्ज केल्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक 

* गंभीर स्वरुपाचा कोरोनाबाधित : 
1) डिस्चार्ज करतेवेळी कोणतीही लक्षणे नसावे 
2) कोरोनाचा दुसऱ्यांदा स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आवश्‍यक 
3) या रुग्णालाही दहाव्या दिवशी डिस्चार्ज करणे 
4) या रुग्णांची पहिली आणि दुसरीच कोरोनाची चाचणी आवश्‍यक. तिसऱ्या चाचणीची गरज नाही. 

नवीन डिस्चार्ज पॉलिसीमुळे रुग्णालयात होणारी संशयित रुग्णांचे प्रमाण कमी होण्यास होईल. तसेच, स्वॅबचे प्रमाणही कमी होईल. ज्यामुळे प्रलंबित स्वॅबचे प्रमाणही घटेल. तसेच बाधित रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होणार आहे. - डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Ladki Bahin Yojana Latest Update : 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

विचित्रच! जाहिरातीचं शूटींग अन् खांदा निखळला; स्टार खेळाडू IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेला मुकणार, वाढली डोकेदुखी

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Numerology: मूलांक १ असलेल्या लोकांवर का असते श्री गणेशांची कृपा?गणपती बाप्पा अन् अंक १ चा काय आहे संबंध?

SCROLL FOR NEXT