Corona patients are being treated at the hospital without permission nashik marathi news 
नाशिक

कोरोनाकाळात रुग्णालयांचा गोरखधंदा सुरु; परवानगी नसताना रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ

विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ऑक्सिजनसह खाटांची कमतरता भासत असली तरी यानिमित्ताने काही बंद पडलेली रुग्णालये पुन्हा सुरू करून कोरोनाकाळात व्यवसाय करण्याचा नवा धंदा शहरात सुरू झाला आहे. यासंदर्भात गंजमाळ येथील रुग्णालयासंदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर प्रकार समोर आला. या रुग्णालयात परवानगी नसताना कोविडचे रुग्ण दाखल करून घेतले जात असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. 

गंजमाळ येथील सुपर मार्केट कॉम्प्लेक्समधील पहिला मजला पाच वर्षांपासून बंद आहे. या मजल्यावर १ सप्टेंबरपासून ‘समय’ नावाने हॉस्पिटल सुरू झाले आहे. हे हॉस्पिटल जनरल व अपघाताच्या रुग्णांसाठी असल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. परंतु चार-पाच दिवसांपासून या रुग्णालयात कोविडचे रुग्ण दाखल करून घेतले जात आहेत. रुग्णालयाच्या परिसरात कोविड रुग्णांसह त्यांचे नातेवाईक राजरोसपणे वावरत असून, त्यांच्या मुक्तसंचारामुळे या कॉम्प्लेक्समधील अन्य दुकानदार व कामगारांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. रुग्णालयांकडून कोविड रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. हॉस्पिटल व कॉम्प्लेक्समध्ये ये-जा करण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे. रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या बायोवेस्ट कॉम्प्लेक्सच्या परिसरात पडलेले दिसतात.

संसर्गाचा धोका वाढला

कोविड रुग्णालयासाठी महापालिकेने ठरवून दिलेल्या अटी-शर्तींचे समय रुग्णालयाकडून पालन होत नाही. रुग्णालयासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नाही. रुग्णांसह नातेवाईक सर्वसाधारण पार्किंगमध्येच वाहने उभी करतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. समय हॉस्पिटलची पाहणी करून ते बंद करावे, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. जानकी फर्निचर, गुरुनानक ऑटो हाउस, सोनी अर्थमूव्हर्स, जैन फर्निचर, गॅलक्सी या दुकानदारांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.  

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: जिवलग मित्रांचे स्वप्न भंगले! आर्मी भरतीची परीक्षा देऊन येताना दोन तरुणांचा ट्रक-दुचाकी अपघातात मृत्यू

Rajgad Leopard : राजगडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतकरी भयभीत; शेतकामासाठी मजूर मिळेनात!

Latest Marathi Breaking News Live : बिहारमध्ये सरकार स्थापनेबाबत पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरू

Kopargaon Accident:'वाहन चालकाचा होरपळून मृत्यू'; आराम बस आणि चारचाकीचा भीषण अपघात, मनमाड महामार्गावरवरील घटना..

Pimpri Crime : मोबाईल उचलला नाही म्हणून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न; तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा नोंदवला!

SCROLL FOR NEXT