coronavirus updates nashik 
नाशिक

तब्बल १४२ दिवसांनतर शहरात कोरोनामुळे मृत्‍यू नाही; जिल्‍ह्‍यातील बाधितांची संख्या नव्वद हजारावर

अरुण मलाणी

नाशिक : एकीकडे जिल्‍ह्‍यात नव्‍याने आढळणार्या कोरोना बाधितांची संख्या कमी होत असतांना, कोरोनाच्‍या बळींचे प्रमाण गेल्‍या काही दिवसांत घटल्‍याची दिलासादायक स्‍थिती आहे. मंगळवारी (ता.२०) नाशिक महापालिका हद्दीत एकाही रूग्‍णाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला नाही. तब्‍बल १४२ दिवसांनंतर शहरात दिवसभरात एकही मृत्‍यू झाला नसल्‍याची नोंद आहे. मंगळवारी दिवसभरात ४३४ नवीन बाधित आढळले असून, ५५९ रूग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. तर तीन रूग्‍णांचा जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे मृत्‍यू झाला. जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांच्‍या संख्येने नव्वद हजारांचा आकडा ओलांडला आहे. 

एकूण मृत्‍यूंचा आकडा १ हजार ६१३

गेल्‍या ३१ मेस नाशिक शहरात कोरोनामुळे एकही मृत्‍यू झाला नव्‍हता. त्‍यानंतर दर दिवशी शहरातून किमान एकतरी कोरोनाचा बळी जात होता. मंगळवारी झालेल्‍या तीन मृत्‍यूंमध्ये निफाड तालुक्‍यातील लासलगाव येथील ६१ वर्षीय पुरूष तर डोंगरगाव येथील ६५ वर्षीय महिला रूग्‍णाचा अशा नाशिक ग्रामीण भागातील दोन रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. तर मालेगाव महापालिका हद्दीत ६१ वर्षीय पुरूषाचा मृत्‍यू झाला आहे. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण मृत्‍यूंचा आकडा १ हजार ६१३ झाला आहे.

नव्वद हजारांचा आकडा ओलांडला

दिवसभरात आढळलेल्‍या नवीन कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ३०८, नाशिक ग्रामीणचे १११, मालेगावचे दहा तर जिल्‍हाबाह्य पाच बाधितांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील २२६, नाशिक ग्रामीणचे २९१, मालेगावचे ३४ तर जिल्‍हाबाह्य आठ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांच्‍या संख्येने नव्वद हजारांचा आकडा ओलांडला असून, आतापर्यंत ९० हजार ०७० बाधित आढळून आले आहेत. यापैकी ८१ हजार ९३७ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्‍थितीत ६ हजार ५२० बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

दिवसभरात दाखल रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ९२७, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ७१, मालेगाव महापालिका रूग्‍णालये १०, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय रूग्‍णालयात आठ तर जिल्‍हा रूग्‍णालयात तीन रूग्‍ण दाखल केले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ९९२ रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते.  

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT