coronavirus esakal
नाशिक

कोरोनाग्रस्तांना ‘अव्हस्क्युलर नेक्रोसिसची' बाधा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनासारख्या भीषण संसर्गामुळे कोविडग्रस्त रुग्णांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. कोरोना बरा झाल्यानंतर देखील अनेक दिवसांच्या कालावधीनंतर श्वसनाच्या आजारांसह इतर आजारांमध्ये हाडांच्या दुखापती, हाडांचे आजार, हाडांची झीज इत्यादी आजार आढळून येत आहेत. यातूनच खुब्यांच्या हाडांमध्ये अव्हस्क्युलर नेक्रोसिससारखे आजार उद्‌भवत आहेत. अशातच ज्या लोकांना एक वर्षापूर्वी कोविड झाला होता अशांमध्ये खुब्याच्या आजारांचे प्रमाण एमआरआय केल्यावर लक्षात येत आहे. नाशिक शहरात अशा रुग्णांची संख्या अधिकतेन वाढल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. (corona positive patients suffer after corona face problem of avascular necrosis update nashik news)

नाशिक येथील वोक्हार्ड हॉस्पिटलचे सीनिअर ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. पंकज गुंजाळ म्हणाले, की बऱ्याचदा रुग्णांना पाठीच्या किंवा खुब्याच्या दुखापतीचे विश्लेषण करणे अवघड जाते. बऱ्याच रुग्णांमध्ये मणक्याचाही आजार असतो आणि त्यामुळेही खुब्याचे दुखणे होऊ शकते, हे लक्षात येत नाही. मागील एका वर्षात सांधेदुखीच्या तक्रारी घेऊन २५ ते ३० या वयोगटांतील तरुण रुग्ण अव्हस्क्युलर नेक्रोसिसने ग्रस्त आहेत. या आजारामुळे खुब्यातील हाडांचा रक्तपुरवठा कमी होतो त्याने हाड निर्जीव होण्यास सुरवात होते. यातून हाडांमध्ये सूज निर्माण होणे, पाणी जमा होणे अशा गोष्टी घडतात. या परिस्थितीत रुग्णांच्या खुब्यामध्ये असह्य वेदना होतात.

अव्हस्क्युलर नेक्रोसिस होण्यामागे अनेकदा कारणे समजत नाहीत. अव्हस्क्युलर नेक्रोसिसचे सध्याचे वाढते प्रमाण बघता कोविड त्याचे कारण आहे का, अशी शंका निर्माण होते. प्रमाणाबाहेर अनियमित अथवा सल्ल्याशिवाय घेतलेले स्टेरॉइड, दारू, सिगारेटचे अधिक प्रमाण, रक्ताचे विकार, सिकल सेल ही कारणेसुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. अव्हस्क्युलर नेक्रोसिस हा चार टप्प्यांतील आजार आहे. पहिल्या टप्प्यात रुग्णांना सौम्य स्वरूपात हाडांच्या वेदना होण्यास सुरवात होते.

दुसऱ्या टप्प्यात रुग्णांचे प्रमाण अधिक आढळून येते. यात रुग्णाचे दुखणे वाढत जाऊन हाडांमध्ये फ्लुइड जमा होते. त्यास एडिमा असे म्हणतात. यासाठी कोअर डिकम्प्रेशनद्वारे रुग्णाच्या हाडांमध्ये होल केले जाते आणि पोकळी निर्माण करून हाडांमधील पाणी काढले जाते आणि आतले प्रेशर कमी होते. ज्यामुळे चौथ्या टप्प्यापर्यंत जाण्याचा धोका तूर्त टाळण्यास मदत होते. तसेच रुग्णाच्या स्नायूंची ताकद वाढवत चौथ्या टप्प्यापर्यंत हा आजार जाण्यास विलंब होतो. जेव्हा रुग्णाचे आजाराकडे दुर्लक्ष होते अथवा त्याचे योग्य निदान होत नाही, आजार वाढत जातो. लवकरच तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात पोचतो. अशा परिस्थितीत दुखणं कमी करण्यासाठी जॉइंट हिप रिप्लेसमेंट (THR) करावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT