corona virus
corona virus esakal
नाशिक

दिलासादायक! शहरात कोरोना रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

विक्रांत मते

नाशिक : मार्च महिन्यात कोरोना संसर्गवाढीत (corona virus) देशात चौथ्या स्थानावर असलेल्या नाशिक शहरात विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसण्यास सुरवात झाली असून, रिकव्हरी रेट (recovery rate) तब्बल ९५.६६ पर्यंत पोचला आहे. राज्यात सर्वाधिक रिकव्हरी रेट असल्याने शहरावर आलेले संकट प्रशासन दूर करण्यास यशस्वी झाल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. (Corona recovery rate in city at 95 percent)

राज्यात सर्वाधिक रिकव्हरी रेट

मागील वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर रुग्णसंख्येत टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात कोरोना उच्चतम पातळीवर होता. त्यानंतर मात्र रुग्णसंख्या झपाट्याने घटली. जानेवारी महिन्यात कोरोना होता की नाही, अशी परिस्थिती होती; परंतु दुसऱ्या लाटेने सर्व गणिते पुन्हा बिघडवली. फेब्रुवारीअखेरपासून कोरोना संसर्गाने पुन्हा उचल खाल्ली. मार्च महिन्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत सहा ते सात पटींनी रुग्ण वाढले. दिवसाला तीन हजार रुग्ण येथपर्यंत आकडेवारी पोचली. मार्च व एप्रिल महिन्यात एक लाख रुग्ण वाढले. अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा तीस हजारांपर्यंत पोचला होता. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे. सध्या ९५.७६ टक्के रिकव्हरी रेट असून, राज्यात सर्वाधिक असल्याची नोंद झाली आहे. तीस हजार अॅक्टिव्ह रुग्णसंख्या सात हजारांच्या खाली पोचली आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांपर्यंत पोचला आहे.

रुग्णालयांमध्ये पन्नास टक्के बेड रिक्त

रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे रुग्णालयांमधील खाटा रिक्त होण्याचे प्रमाणदेखील पन्नास टक्क्यांवर आल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र रुग्णालयांकडून सेंट्रल बेड रिझर्व सिस्टममध्ये आकडेवारी नियमितपणे भरली जात नसल्याने बेड रिक्त होण्याच्या दाव्याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.

बेडची संख्या घटली

रुग्णसंख्या घटत असल्याने रुग्णालयांमध्ये बेड रिक्त होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय वगळता नवीन बिटको रुग्णालयात २९८, ठक्कर डोम कोविड सेंटरमध्ये २५५, समाजकल्याण ४०६, संभाजी स्टेडिअम १७०, तर मेरी कोविड सेंटरमध्ये १३९ बेड रिक्त आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये साडेचार हजार बेडपैकी पन्नास टक्के बेड रिक्त असल्याचे सांगितले जात आहे.

कडक निर्बंध त्यानंतर लॉकडाउन, तसेच महापालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब गेल्याने रुग्णसंख्या झपाट्याने घटली आहे. परंतु यापुढेदेखील काळजी घेणे यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT