aarti_singh_ips.jpg 
नाशिक

बंदोबस्तासाठी 'अप-डाउन'मुळे कोरोनाचा धोका...शिस्तभंगाची होणार कारवाई

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात मालेगाव शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा चढता आलेख रविवारीही (ता. 3) कायम होता. दिवसेंदिवस वाढत चाललेली ही रुग्णसंख्या चिंताजनक आहे. त्यातल्यात्यात पोलीस देखील कोरोनाग्रस्त होत असल्याचे दिसून आल्याने ही चिंतेची बाब आहे. कोरोनाग्रस्त पोलिसांमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, बंदोबस्तासाठी नियुक्तीचे ठिकाण सोडून अन्यत्र जाणाऱ्या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.

पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई

मालेगावमध्ये बंदोबस्तावर असलेले 61 पोलिस कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यातीलच काही कोरोनाग्रस्त पोलिसांमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, बंदोबस्तासाठी नियुक्तीचे ठिकाण सोडून अन्यत्र जाणाऱ्या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह म्हणाल्या. रविवारी सकाळच्या सत्रात आलेल्या 128 रिपोर्टमध्ये मालेगावचे 27 रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील दहा रुग्णांचे दुसरे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत, तर 91 रिपोर्ट निगेटिव्ह आले. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्यांमध्येही दोन पोलिस, तीन डॉक्‍टर व एका नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश आहे. त्यानंतर, दुपारी मालेगावमधील आणखी एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

हेडक्वार्टर सोडणे भोवणार 

मालेगाव येथे नाशिक ग्रामीण पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. मालेगाव वगळता अन्य तालुक्‍यांतूनही पोलिस बंदोबस्तावर नियुक्त करण्यात आलेले आहेत. नियुक्ती असेपर्यंत त्यांच्यासाठी मालेगाव हेडक्वार्टरमध्येच राहणे बंधनकारक आहे. असे असतानाही काही पोलिस कर्मचारी ड्यूटीनंतर जिल्ह्यातील आपले निवासस्थान गाठत होते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले आहेत. ही बाब समोर आल्याने हेडक्वार्टरमधून विनापरवानगी निवास गाठणाऱ्या (अप-डाउन करणारे) कर्मचाऱ्यांवर पोलिस अधीक्षकांनी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. 

बारा संशयित रुग्णांचा मृत्यू 

मालेगावमध्ये पश्‍चिम भागात कोरोनाचा शिरकाव सुरूच आहे. रविवारी आलेल्या अहवालांमध्ये समावेश असलेल्यांमध्ये संगमेश्‍वर भागातील पीठगिरणीचालकाचा समावेश आहे. त्यांची गिरणी शुक्रवारपर्यंत सुरू होती. त्यामुळे किती जण संक्रमित झाले असतील, याबाबत मोठी चिंता आहे. तसेच नूरबाग भागातील एकाच कुटुंबातील आठ जणांचाही यात समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण 52 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (ता. 2) रात्री जीवन हॉस्पिटलमध्ये सहा, तर म्हाळदे घरकुल उपचार केंद्रात एक अशा सात संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी दिवसभरात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला.  

बंदोबस्त असताना हेडक्वार्टर सोडणे म्हणजे शिस्तभंग आहे. त्यामुळे जे पोलिस हेडक्वार्टरमधून विनापरवानगी निवासस्थानी गेले होते, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. बंदोबस्त काळात कोणीही नियुक्तीचे ठिकाण न सोडणे बंधनकारक आहे. - डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT