corona positive esakal
नाशिक

नाशिक : केबीएच महाविद्यालयातील 17 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्‍ह

अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असतांना, आता कोराना विषाणूने शैक्षणिक प्रांगणात शिरकाव केला आहे. शहरातील केबीएच दंतशास्‍त्र महाविद्यालयातील 17 विद्यार्थ्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असल्‍याची माहिती वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून जिल्‍ह्‍यात आढळणाऱ्या दैनंदिन कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्‍यातच जिल्‍ह्‍यात शालेय विद्यार्थ्याच्‍या नमून्‍यात कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron) व्‍हेरीएंट आढळला होता. शैक्षणिक क्षेत्र पूर्वपदावर येत असतांना, आता पुन्‍हा कोरोनारुपी संकट उभे ठाकले आहे.

बाधितांच्‍या संपर्कात आलेल्‍या सर्वांची तपासणी

यासंदर्भात महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण कुठल्‍या माध्यमातून झाली, याचा शोध घेतला जातो आहे. तसेच पॉझिटिव्‍ह आलेल्‍या बाधितांच्‍या संपर्कात आलेल्‍या शिक्षक व अन्‍य घटकांची स्‍वॅब चाचणी केली जाणार असल्‍याचे सांगितले जाते आहे. यापैकी काही विद्यार्थी वसतीगृहात वास्‍तव्‍यास असण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे. सखोल तपासानंतर अधिकच्या बाबी स्‍पष्ट होतील, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

Mumbai Local: कल्याण-सीएसएमटी लोकल १५ डब्यांच्या करा, श्रीकांत शिंदे यांची मागणी

SCROLL FOR NEXT