Corona Update  sakal media
नाशिक

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण चारशेपेक्षा कमी

अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात उपचार घेत असलेल्‍या कोरोनाबाधितांच्‍या संख्येत लक्षणीय घट होत आहे. गेल्‍या पाच दिवसांत ही संख्या शंभराहून अधिकने कमी झाली आहे. त्‍यातच सोमवारी (ता. १५) जिल्‍ह्यातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या चारशेच्‍या आत आली. दिवसभरात ५४ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर ५६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. एका बाधिताचा मृत्‍यू झाला. यातून सद्यःस्‍थितीत उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ३९७ झाली आहे.

गेल्‍या ११ नोव्‍हेंबरला जिल्‍ह्यात नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या दुप्पट राहिली होती. त्‍यातच सातत्‍याने कोरोनामुक्‍त रुग्‍णांची अधिक राहत असलेल्‍या संख्येमुळे जिल्‍ह्यातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या कमी होत चालली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत प्रथमच ही संख्या चारशेपेक्षा कमी राहिली. सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ३२, नाशिक ग्रामीणमधील २२ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, हा मृत नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे.

प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत सातत्‍याने चढ-उतार सुरू आहे. एक हजार आठ रुग्‍णांचे अहवाल सायंकाळी उशिरापर्यंत प्रलंबित होते. यापैकी ७०१ नाशिक ग्रामीणमधील, १५५ नाशिक शहरातील, तर मालेगावच्‍या १५२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४९९ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ४९४ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील होते. गेल्‍या दोन दिवसांपासून जिल्‍हा रुग्‍णालयात एकही रुग्‍ण दाखल झाला नव्‍हता. त्‍यात सोमवारी दोन रुग्‍ण दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocity Act: मोठी बातमी! अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT