corona update esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात कोरोनाची ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या ५६ ने घटली

जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या अधिक राहत आहे

अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या अधिक राहत आहे. यामुळे उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्ण संख्येत घट होत चालली आहे. शुक्रवारी (ता.८) जिल्‍ह्यात ७८ रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले. १३२ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्णसंख्येत ५६ ने घट झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात ८४१ बाधित उपचार घेत आहेत.


शुक्रवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ३१, नाशिक ग्रामीणमधील ४४ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक तर जिल्‍हा बाहेरील दोन रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहे. जिल्‍ह्यात दोन बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद असून, दोघे मृत नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. सध्या प्रलंबित अहवालांची संख्या एक हजाराहून अधिक राहत आहे. सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार २९४ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणच्‍या ९९७ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. तर नाशिक शहरातील १६६, मालेगावच्‍या १३१ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ८०६ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ७८० रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात एक, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात तीन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील २२ रुग्‍णांचा संशयित रुग्‍णांमध्ये समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: “गलत करते हो यार…” रोहित शर्मा संतापला; चिमुकलीच्या सुरक्षिततेसाठी पुढे सरसावला, मुंबई विमानतळावर काय घडलं?

राम कपूर अन् साक्षी तंवर यांचा 'तो' बोल्ड सीन; पत्नी गौतमीला कानोकान नव्हती खबर, रात्री समजलं तेव्हा...

Railway News: रेल्वेच्या नियमांमध्ये मोठा बदल! मुलींना आरोग्य लाभ आणि प्रवास पास मिळणार, पण कोणत्या? जाणून घ्या...

Shikhar Dhawan : बांगलादेशमध्ये हिंदू महिलेवर सामूहिक बलात्काराच्या घटनेवर शिखर धवनचा संताप, म्हणाला..

Latest Marathi News Live Update: वार्ड क्रमांक ३४ मधील अपक्ष उमेदवार अरबाज अस्लम शेख यांच्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT