Corporators oppose privatization of hospital nashik marathi news 
नाशिक

‘बिटको’ खासगीकरणाच्या विरोधात भाजप-शिवसेनेचे नगरसेवक एकत्र

विक्रांत मते

नाशिक : गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत बिटको रुग्णालयातील व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचा निर्णय नाशिक रोड विभागातील भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांना रूचला नाही. त्यामुळे ऑनलाइन महासभेत नगरसेवकांनी स्थायी समितीच्या भूमिकेवर आगपाखड करत खासगीकरण करू नये, अशी भूमिका घेतली. 

नवीन बिटको रुग्णालयात ऑक्सिजन टाकी बसविल्यानंतर खासगी रुग्णालयांना दिलेले व्हेंटिलेटर परत घेण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या. भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी बिटको रुग्णालयातील व्यवस्थापनाचे खासगीकरणाचा विषय चर्चेला आणला. भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी बिटको रुग्णालयाचे खासगीकरण कदापि होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. गरिबांसाठी सेवा देणारे रुग्णालय असल्याने खासगीकरण करण्याऐवजी मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर विकास करण्याची मागणी त्यांनी केली. प्रा. शरद मोरे यांनी रुग्णालय खासगीकरण करण्यास तीव्र विरोध दर्शविला. शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, सुनील गोडसे यांनी विरोध दर्शविला. 

व्हेंटिलेटर परत घेणार 

पंतप्रधान केअर फंडातून महापालिकेला प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटरचा मुद्दा सभागृहनेते सतीश सोनवणे, गुरुमित बग्गा, सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित करताना खासगी रुग्णालयांना वापरासाठी देण्यात आलेले व्हेंटिलेटर परत घेण्याची मागणी केली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था नसल्याने १३ व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना दिल्याची कबुली वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयांना देण्यात आलेले तेरा व्हेंटिलेटर परत घेण्याच्या सूचना महापौर कुलकर्णी यांनी दिल्या.  

संपादन - रोहित कणसे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नॅशनल कॉन्फरन्समध्ये मोठी बंडखोरी? २५ आमदार नाराज, उमर अब्दुल्लांना दिला १४ दिवसांचा अल्टिमेटम

U19 Asia Cup: दिवाळीच्याच दिवशी India vs Pakistan सामन्याचा धमाका; भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक अन् कुठे पाहाणार मॅच, जाणून घ्या

युरोप पेटलं! फ्रान्सनंतर आता जर्मनीतही ‘Gen Z' च्या आंदोलनाला हिंसक वळण; २७ पोलीस कर्मचारी जखमी, नेमकं काय घडतंय?

Silk farming skill training center : शेतकरी अन् सुशिक्षित तरुणांसाठी मोठी बातमी! रेशीम उद्योगाला गती देण्यासाठी 'या' जिल्ह्यात सुरू होणार विशेष प्रशिक्षण केंद्रे; रोजगाराची सुवर्णसंधी

Sharad Pawar drought visit relief : 'पाण्यासाठी गाव विकायला काढलेल्या' गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी! शरद पवारांनी जागेवरच सुपूर्त केला ५० लाखांचा धनादेश

SCROLL FOR NEXT