Counterfeit bio diesel is being sold in the state marathi news 
नाशिक

सावधान! बायोडिझेलच्या नावाने राज्यात काळा बाजार; भेसळ करून होतेय डिझेलची विक्री

प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : केंद्र सरकारने बायोडिझेल (बी १००) विक्रीला परवानगी दिल्याची संधी साधून बायोडिझेलच्या नावाने विविध इंधन भेसळ करून कमी दरात बायोडिझेल विक्रीचा नवा गोरखधंदा राज्यात फोफावत आहे. डिझेलपेक्षा २० ते २५ रुपये स्वस्त बायोडिझेल मिळत असल्याने अनेक वाहनधारक या इंधनाचा वापर करत आहेत. प्रत्यक्षात फक्त बायोडिझेलवर वाहन चालूच शकत नसल्याने या डिझेलमध्ये कशाची भेसळ होते, हे पाहणे आवश्‍यक आहे. हा काळा बाजार दिवसेंदिवस वाढत असल्याने इंधनापोटी मिळणाऱ्या कोट्यवधींच्या महसुलावर शासनाला पाणी फेरावे लागत आहे. 

बायोडिझेलवर फक्त १८ टक्के जीएसटी

बायोडिझेल पंप हे प्रामुख्याने किरकोळ मिश्रण विक्रीसाठीच आहे. जिल्ह्यात १८ ते २० बायोडिझेल पंप कार्यान्वित झाले आहेत. पेट्रोलमध्ये काही प्रमाणात इथेनॉल मिश्रण केले जाते. त्याचप्रमाणे डिझेल टाकल्यानंतर ठराविक लिटर प्रमाणात १० ते २० टक्के बायोडिझेल टाकून वाहन वापर केला पाहिजे. जैविक कचऱ्यापासून (जेट्रोफा, खराब तेल, अमोनिया, मॉलेसेस आदी) बायोडिझेलची निर्मिती होते. विशेष म्हणजे या सर्व इंधनाचे गुजरात कनेक्शन दिसून येते. गुजरातमध्ये बायोडिझेल विक्रीचे एक हजाराहून अधिक पंप सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे डिझेलवर २१ टक्के व्हॅट, अबकारी कर, दुष्काळी कर यासह विविध प्रकारच्या एकत्रित करांची रक्कम ४७ टक्के आहे. यातून शासनाला मोठा महसूल मिळतो. याउलट बायोडिझेलवर फक्त १८ टक्के जीएसटी आहे. त्यात परतावा मिळत असल्याने अनेकांचा ओढा बायोडिझेलकडे आहे. काही मोठे ट्रान्स्पोर्ट चालक, व्यावसायिक व इंधन काळा बाजार करणारे सर्रासपणे बायोडिझेलचा वापर करीत आहेत. यामुळे राज्यातील पेट्रोल, डिझेल विक्री करणाऱ्या पेट्रोलपंप व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे फामफेडाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

महसुलाचे नुकसान

नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनने या संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जिल्ह्यातील सर्व बायोडिझेल पंप कुठलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू आहेत. यामुळे शासन महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पेट्रोलपंप व्यावसायिकांनी केली आहे. बायोडिझेल पंपचालक बायोडिझेलची विक्री न करता डिझेलसदृश इंधनाचीच विक्री करीत असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण भोसले यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

बायोडिझेल नमुन्यांची तपासणी आवश्‍यक

बायोडिझेलची डेन्सिटी तपासली असता डिझेलप्रमाणेच येते. यातूनच भेसळ असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे बायोडिझेल पंपासाठीही पेट्रोलपंपाप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य विविध विभागांच्या ११ प्रकारच्या परवानग्या घेणे आवश्‍यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने पेट्रोलपंप असोसिएशनला आमच्या कार्यालयातर्फे कुठलीही परवानगी दिली नसल्याचे माहिती अधिकारात कळविले आहे. त्यामुळे बायोडिझेल पंप विनापरवाना सुरू आहेत की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बायोडिझेल पंप कारखान्यांची चौकशी करून बायोडिझेल नमुन्यांची तपासणी करणे आवश्‍यक असल्याचे सरचिटणीस सुदर्शन पाटील यांनी सांगितले. 

डिझेलपेक्षा बायोडिझेल हे २० ते २५ रुपये स्वस्त आहे. बायोडिझेल विक्रेते डिझेल, बायोडिझेल व फ्युएल ऑइल या तिन्हींची भेसळ करून बायोडिझेलच्या नावाने डिझेलसदृश इंधन विक्री करीत आहेत. कांडला पोर्ट व गुजरातमधून प्रामुख्याने फ्युएल ऑइल येते. गुजरातमध्ये हजाराहून अधिक बायोडिझेल पंप सुरू झाले आहेत. नागपूर येथील एका बड्या बायोडिझेल विक्रेत्यावर पुरवठा विभागाने बुधवारीच कारवाई केली असून, तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले आहेत. बायोडिझेल विक्रीतील काळा बाजार शासनाने रोखावा. यामुळे शासनाचा महसूल बुडण्याबरोबरच पेट्रोलपंप व्यावसायिकांच्या व्यवसायालाही घरघर लागली आहे. 
-अमित गुप्ता (नागपूर) राज्य सरचिटणीस, फामफेडा, महाराष्ट्र 


विविध इंधनांची डेन्सिटी 
पेट्रोल - ७०० - ७५० 
डिझेल - ८२० - ८४० 
बायोडिझेल - ८६० - ९०० 
फ्युएल ऑइल - ७८० - ८००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT