Fraud esakal
नाशिक

जादा रकमेचा फायदा पडला महागात; दाम्पत्याने 35 लाखाला घातला गंडा

विनोद बेदरकर

नाशिक : कापड व्यवसायात रक्कम गुंतविल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने एकाला ३५ लाख रुपयांचा गंडा (Fraud) घालून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विश्वास ठेवणे पडले महागात

तक्रारदार प्रकाश दत्तात्रेय सहाणे (५३, रा. गौरव पार्क, शरणपूर रोड, नाशिक) यांच्याशी संशयित सुनीता मनोज माहेश्‍वरी व मनोज प्रकाश माहेश्‍वरी (पत्ता माहीत नाही) यांनी संपर्क साधला. दरम्यान, माहेश्‍वरी दाम्पत्याने सहाणे यांचा विश्‍वास संपादन केला. त्यांना विश्‍वासात घेऊन कपड्यांच्या व्यवसायात मोठी रक्कम गुंतविल्यास तुम्हाला जादा रकमेचा फायदा करून देतो, असे प्रलोभन दाखविले. सुनीता माहेश्‍वरी व मनोज माहेश्‍वरी यांच्यावर विश्‍वास ठेवून सहाणे यांनी १ मार्च २०१८ ते १ सप्टेंबर २०१९ दरम्यान येवलेकर मळा येथील गंगोत्री अपार्टमेंटमधील १ व २ नंबरच्या शॉपमध्ये माहेश्‍वरी यांना ३५ लाख रुपयांची रक्कम दिली.

बरेच दिवस होऊनही सहाणे यांना दिलेल्या पैशाचा जादा मोबदला मिळत नसल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी माहेश्‍वरी दांपत्याकडे विचारणा केली असता पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच, या दाम्पत्याने ३५ लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन सहाणे यांचा विश्‍वासघात करून आर्थिक नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

Latest Marathi News Live Update : विदर्भात ६ जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT