tukaram mundhe 1.jpeg
tukaram mundhe 1.jpeg 
नाशिक

शासनाच्या अधिकारात आयुक्तांची भूमिका काय? 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दोन वर्षांपूर्वी शहरातील मिळकतींवर पाच ते सहापट कर लावल्यानंतर महासभेने तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय रद्द ठरवत ठराव दफ्तर दाखल केल्याने शासनाच्या अधिकारात हस्तक्षेप झाल्याचा मुद्दा उच्च न्यायालयाच्या सुनावणीत समोर आला आहे. शासनाच्या अधिकारात आयुक्तांची भूमिका काय असते, याबाबत न्यायालयाने विचारणा करताना 28 जानेवारीला पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. 24) दिला. 

करवाढीविरोधातील याचिकेत न्यायालयाकडून विचारणा 

1 एप्रिल 2018 नंतर अस्तित्वातील मोकळ्या भूखंडांसह मालमत्तांवर पाच ते सहापट कर लावण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला होता. याविरोधात मोठ्या प्रमाणात शहरात आंदोलन उभे राहिले होते. महासभेने नागरिकांच्या संतापाची दखल घेत करवाढ रद्द ठरविली. महासभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर अंमलबजावणी करण्याऐवजी तो ठराव दफ्तर दाखल करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, ठरावाची अंमलबजावणी करायची नसेल, तर शासनाकडे विखंडित करण्यासाठी ठराव पाठविणे अपेक्षित होते. मात्र मुंढे यांनी शासनाच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याने नगरसेवक गुरुमित बग्गा, अशोक मुर्तडक, शाहू खैरे व गजानन शेलार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत ठराव दफ्तरी दाखल करणे म्हणजे कुठलीही कारवाई न करणे, असा होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला.

नियम 451 नुसार शासनाला ठराव पाठवणे बंधनकारक आहे का?

महापालिकेतर्फे बाजू मांडताना सुनावणी झाल्यानंतर याचिकाच दाखल करता येत नसल्याचे सांगण्यात आले. परंतु न्यायालयाने हरकत फेटाळून लावली. नियम 451 नुसार शासनाला ठराव पाठवणे बंधनकारक आहे का, यावर शासन प्रतिनिधीने म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. त्यानुसार 28 जानेवारीला सुनावणी घेण्याचे ठरले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. जे. काथवाला, बी. पी. कुलाबावाला यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. संदीप शिंदे यांनी बाजू मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT