मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील पूर्व-पश्चिम भागातील खेळाडूंना खेळण्यासाठी कॉलेजचे मैदान शहरात सर्वांत मोठे आहे. या मैदानावर खेळाडू क्रिकेट, सायकल चालविणे, धावणे, फुटबॉल, हॉकी यांसह असंख्य खेळांचा सराव करत असतात. त्यामुळे मैदानावर दिवसभर खेळाडूंचा राबता असतो. प्रत्येक शुक्रवारी हे मैदान खेळाडूंनी भरलेले असते. अशा परिस्थितीत सध्या येथे पंडित श्री प्रदीपजी मिश्रा यांची श्री शिवमहापुराण कथा सुरू आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंनी खेळण्यासाठी मुस्लिमबहुल पूर्व भागातील आराम हॉटेलसमोरील मैदानाची निवड केली आहे. ( Cricketers changed ground due to Shiva Mahapuran katha at malegaon Nashik News)
येथील कॉलेज मैदानावर श्री शिवमहापुराण कथा सुरू असल्याने क्रिकेटप्रेमी शहराजवळील मैदानावर क्रिकेट खेळत आहेत. शुक्रवारी शहरातील सर्व व्यवसाय व कामांना सुटी असते. त्यामुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी नागरिक कुटुंबीयांसह हॉटेल, गार्डन आदी ठिकाणी जातात. तसेच, असंख्य तरुण येथील मैदानावर दर शुक्रवारी क्रिकेट खेळण्यासाठी जमा होतात. पूर्व भागातील तरुण टीम करून येथे क्रिकेट खेळतात.
त्यामुळे या मैदानावर गर्दी उसळते. मात्र येथील मैदानावर सध्या श्री शिवमहापुराण कथा सोहळा सुरू आहे. त्यामुळे येथील मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांनी आपला मोर्चा मुंबई-आग्रा महामार्गालगत आराम हॉटेलसमोरील मोठ्या प्रशस्त जागेत वळविला आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणी लहान मुले व तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे बघावयास मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.