drunken 1.jpeg
drunken 1.jpeg 
नाशिक

"तुझ्या बापाचा चौक आहे का?" असं म्हणत लॉकडाऊनमध्ये दारूडयांचा धिंगाणा अन् मग..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि दारूबंदीची अंमलबजावणी सुरू असतांना घरासमोर दारू पिण्यास मनाई केल्याने दोघा दारूड्यांनी पतीस जीवे ठार मारण्याची धमकी देत मायलेकींना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत विवाहीतेच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने ती जखमी झाली आहे. उध्दव आणि रोशन (पूर्ण नाव पत्ता नाही) अशी मारहाण करणाऱ्या संशयित मद्यपींची नावे आहेत.

असा घडला संपूर्ण प्रकार

मानसी चेतन मिस्तरी (रा. मायको दवाखान्याजवळ) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या बुधवारी (ता. 1) सायंकाळच्या सुमारास दोघे मद्यपी महिलेच्या घरासमोर दारू पीत बसले होते. यावेळी महिलेने दोघांना हटकल्याने असता दोघा संशयितांना राग आला.. दारू सेवन करून अंगणात बाटली फोडू नका, येथे लहान मुले खेळतात असे म्हटल्याने संशयीतांनी तुझ्या बापाचा चौक आहे का? असे म्हणत विवाहीतेस शिवीगाळ केली. तसेच महिलेस हाताचापटीने मारहाण करीत संशयीत उध्दव याने त्याच्या कमरेस लावलेले धारदार शस्त्र काढून महिलेच्या हातावर वार केला. यावेळी विवाहीतेची आई तिच्या मदतीस धावून आली असता तिलाही दोघांनी मारहाण केली. तु आमच्या नादी लागू नको तसेच पोलीसात तक्रार दाखल केली तर तुझ्या पतीलाही जीवे मारू अशी धमकी दिली.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक वारघडे करीत आहेत. दरम्यान या घटनेने दारूबंदी काळात बेकायदा मद्यविक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला असून मद्यविक्रीत्यांना शोधून काढण्याचे पोलीसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT