bribe crime sakal media
नाशिक

Crime Update : लाचखोर इंजिनिअर अधिकारी LCBच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक -पुणे रोडवरील गांधीनगर येथील लष्करी हद्दीतील दोघा अधिकाऱ्यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सव्वा लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे.

सदरील गुन्ह्यातील मेजर हिमांशू मिश्रा व ज्युनिअर इंजिनिअर मिलिंद वाडिले हे दोघे गॅरिसन इंजिनिअरमध्ये कार्यरत अधिकारी आहेत. कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स) या ठिकाणी ते कार्यरत नव्हते, असा खुलासा संरक्षण विभागाच्या पुणे कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी महेश अयंगार यांनी केला आहे.(Crime update Two bribe takers are Garrison Engineer Officers Nashik Crime News)

ठेकेदाराच्या तक्रारीनुसार, मेजर मिश्रा व वाडिले यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. त्या संदर्भात ठेकेदाराने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने गुरुवारी (ता.१३) रात्री सापळा रचला होता. ठेकेदाराकडून मेजर मिश्रा व वाडिले यांनी १ लाख २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळी दबा धरून असलेल्या सीबीआयच्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT