Nashik Crime News  esakal
नाशिक

Nashik : पॅरोलवरील ‘नॉट रिचेबल’ कैद्यांविरोधात गुन्हे

नरेश हळणोर

नाशिक : राज्य शासनाने कोरोना काळात राज्यभरातील कारागृहातील काही बंदीवानांसाठी पॅरोल (Parole) आणि फर्लो रजा मंजूर केली होती. यात नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील (Central jail) बंदीवानांचाही समावेश होता. मात्र, यातील बहुतांशी बंदीवान कारागृहात परतलेले नाहीत. तर, काही नॉट रिचेबल (Not Reachable) आहेत. यामुळे या बंदीवानांच्या निवासी भागातील २५ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे (Crime) दाखल करण्यात आलेले आहेत. कोरोना आकस्मित अभिवचन रजेच्या तरतुदीनुसार नियमभंग व कारागृहा नियमावलीच्या शिर्षकाखाली सदरील गुन्हे दाखल केले आहेत. (Crimes filed against not reachable prisoners on parole Nashik Crime News)

गेल्या वर्षी २०२०-२१ मध्ये कोरोनाचा मोठ्याप्रमाणात प्रादूर्भाव वाढला होता. त्यावेळी राज्यशासनाच्या आदेशानुसार, राज्यभरातील कारागृहातील काही बंदींना संचित व अभिवचन रजेवर (पॅरोल, फर्लो) घरी सोडण्यात आले होते. याअंतर्गतच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सुमारे ७०० ते ७५० बंदीवानांना रजेवर सोडण्यात आले होते. या बंदीवानांमध्ये गंभीर गुन्हातील बंदी वा पाच वर्षातील शिक्षा झालेल्या बंदींचाही समावेश होता. अभिवचन रजेचा कलावधी ४५ दिवस वा वाढीव रजेचा कालावधी ३० दिवसांचा असतो. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर संबंधित बंदीवानांना पंधरा दिवसांमध्ये कारागृहात परतण्याचे आदेश कारागृह प्रशासनाने दिले होते. त्यामुळे सुमारे ८० ते ८५ टक्के बंदीवान नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात परतले आहेत. मात्र अजूनही सुमारे १०० बंदीवान कारागृहात परतलेले नाहीत. या न परतलेल्या बंदीवान कारागृह प्रशासनाच्या संपर्कात नाहीत.

असे आहेत आदेश

शासनाने १० फेब्रुवारी २०२२ च्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र कारागृह (मुंबई संचित व अभिवचन रजा) नियम, १९५९ चा नियम १९ हा आकस्मिक अभिवचन रजेच्या तरतुदींसह बदलला. शासन व राज्य कार्यकारी समितीने ३१ मार्च २०२२ रोजीच्या आदेशानुसार, कोराेना १९च्या अनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत लागू असलेले सर्व निर्बंध १ एप्रिल २०२२ पासून काढून घेतले आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही बंद्यांस कोरोना आकस्मिक अभिवचन रजा मंजूर हाेणार नाही. तसेच अधिसूचना रद्द केली असल्याने, कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवरील बंद्यांना कारागृहात दाखल करुन घेण्याबत सूचना जारी करण्यात आल्या. त्यानुसार अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आलेल्या सर्व बंद्यांना तत्काळ कारागृहात दाखल करुन घ्यावे. बंद्यांना दाखल करुन घेताना आरटीपीसीआर टेस्ट करावी, शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कैद्यांना कारागृहात दाखल करुन घ्यावे, असे आदेशात म्हटले हाेते.

नजिकच्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे

कारागृहात न परतलेल्या बंदीमध्ये सर्वाधिक हे पाच वर्षातील शिक्षेतील बंदी आहेत. याच लहान-सहान चोरी करणारे, गर्दुले अशा स्वरुपाचे बंदीवान आहेत. कारागृह प्रशासनाकडे बंदीवानांना शोधण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नाही. त्यामुळे न परतलेल्या बंदीच्या निवासी भागातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत सुमारे २५ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

"गंभीर गुन्ह्यातील सर्व बंदी कारागृहात परतले आहेत. जे आलेले नाहीत ते कमी शिक्षेतील बंदी आहेत. यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे."

- प्रमाेद वाघ, कारागृह अधीक्षक, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT