political party esakal
नाशिक

नाशिक : तब्बल सहा नगरसेवकांवर गुन्हे दाखल

विनोद बेदरकर

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या (muncipal election) पार्श्वभूमीवर शहरात विकासकामांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण सोहळ्याचा धडाका सुरू आहे. सध्या लॉकडाऊन (lockdown) शिथील केले असले, तरी मनाई आदेश कायम आहे. तरीही लोकप्रतिनिधींकडून त्याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. यामुळे तब्बल सहा नगरसेवकांवर (corporators) गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सहा नगरसेवकांवर गुन्हे दाखल

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी आणि उपस्थितीवर मर्यादा आल्या आहेत. तरीही लोकप्रतिनिधींकडून त्याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. कोरोना महामारीच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर शहरात मनाई आदेश कायम असताना, विनापरवानगी विकासकामांचे उद्‌घाटन करून गर्दी जमविल्याप्रकरणी सहा नगरसेवकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यात तीन नगरसेविकांचा समावेश असून, पश्चिम विधानसभा मतदारसंघातील हे नगरसेवक आहेत. दीपक दातीर, डी. जी. सूर्यवंशी, सुवर्णा मटाले, प्रतिभा पाटील, भागवत आरोटे, मधुकर जाधव अशी गुन्हे दाखल झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण सोहळ्याचा धडाका सुरू आहे. सध्या लॉकडाऊन शिथील केले असले, तरी मनाई आदेश कायम आहे. त्यामुळे औद्योगीक वसाहतीतील प्रभाग २६ मधील वडारवाडी भागातील हॉटेल पंचरत्न मागे शनिवारी (ता. २५) शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुखांच्या हस्ते रस्ता कॉंक्रिटीकरणाचे उद्‌घाटन झाले.

गर्दी जमविल्याचा आरोप

प्रभाग २८ मधील महालक्ष्मीनगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज समाजमंदिराजवळील पाण्याच्या टाकीचा रविवारी (ता. २६) लोकार्पण झाले. या दोन्ही कार्यक्रमांसाठी संबंधित नगरसेवकांनी गर्दी जमविल्याचा आरोप आहे. कोरोना संसर्गामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, याची जाणीव असतानाही त्यांनी महिला- पुरुषांची गर्दी जमवून शासनाच्या सुचनांकडे आणि पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अंबड पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन सोनवणे यांनी तक्रार दिली असून, उपनिरीक्षक शेवाळे आणि पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT