Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : भाई तुरुंगातून बाहेर आला अन् चक्क कारागृहासमोरच समर्थकांनी जल्लोष केला!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर अथवा न्यायालयाच्या निकालाने मुक्तता झाल्यानंतर जल्लोष करण्याचा पायंडा पडतो आहे. प्रजासत्ताक दिनी आरोपी शाहरूख रज्जाक शेख (रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपुर, जि.नगर) याची मुक्तता झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी कारागृहासमोरच घोषणाबाजी करत गोंधळ घातला. (criminal came out of jail Supporters cheered right in front of nashik road central jail Nashik News)

नाशिक रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीला सव्वा बाराला मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा प्रकार उघडकीस आला. श्रीरामपूर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यामधील आरोपी शाहरूख रज्जाक शेख (रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) हा कारागृहातून मुक्त झाला.

तो बाहेर येताच त्याच्या समर्थकांनी ' आ गये भाई बाहर !', अशी घोषणाबाजी करत त्याच्या सुटकेचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली. यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शाहरूख रज्जाक शेख व समर्थकांविरुद्ध पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस शिपाई महेंद्र जाधव यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

दरम्यान, पुणे रोडवरील डीजीपीनगर ते वडाळा या मार्गावर अलीकडेच अशीच एक घटना घडली होती. खुनाच्या आरोपात मध्यवर्ती कारागृहात असणाऱ्या आरोपीची कारागृहातून सुटका होताच समर्थकांनी ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.

कार, दुचाकीसह हा ताफा डीजीपीनगर ते वडाळा या रस्त्याने पुढे गेला. यावेळी 'देखो देखो कौन आया...' अशा घोषणाही समर्थकांनी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. कारागृहातून बाहेर पडणाऱ्या गुन्हेगारांचे जल्लोषात स्वागत करण्याच्या या प्रथेमुळे कायदा व सुव्यवस्थेवरील ताण वाढत आहे. नाशिक रोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT