Heavy Rain Crop Damage
Heavy Rain Crop Damage esakal
नाशिक

Heavy Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे येवल्यात 9 हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट!

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक येणारा ढगफुटी सारखा पावसाने तालुक्यातील शेतीमधील पिकांचे होत्याचे नव्हते करुन टाकले. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मात्र शासन यंत्रणेनुसार कागदावर केवळ पंचनाम्यानुसार ९ हजार हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दाखविण्यात आल्याने या चुकीच्या नोंदीचा १३ हजार ४६६ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतपीकाचे मोठे नुकसान होवू देखील येथील शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून एक रुपयाची मदत देखील मिळालेली नसल्याने बळिराजाला मदतीची प्रतिक्षा लागली आहे. rops on 9 thousand hectares destroyed due to heavy rain at yeola Nashik News)

तालुक्या यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना जेवढा आधार दिला तेवढेच नुकसानही केले..जुलैत तालुक्यात जेमतेम पडलेल्या पावसाने ऑगस्टच्या मध्यानंतर ऑक्टोबर पर्यंत तुफान फटकेबाजी केली. यामुळे पावसाच्या नुकसानीचे नवे आकडेही येवल्यातील शेतकऱ्यांना पहावयास मिळाले. यापूर्वी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणारा येवला तालुक्याला वार्षिक पर्जन्याची सरासरी ही गाठणे कठीण होते. चालू वर्षी ४९३ मिलिमीटर वार्षिक सरासरी असताना तालुक्यात तब्बल ७२४ मिलिमीटर (१४६ टक्के) पाऊस पडला.

जूनमध्ये ११४ मिलिमीटर सरासरी असताना फक्त ७३ मिलिमीटर पाऊस पडला होता. जुलैत सरते शेवटी हजेरी लावल्याने ३०६ मिलिमीटरवर पाऊस झाला. ऑगस्टची सरासरी ९४ मिलिमीटर असताना १०३ मिलिमीटर पाऊस पडला. जून ते सप्टेंबर या काळात तब्बल ५८९ मिलिमीटर म्हणजेच १२९ टक्के पावसाची नोंद झाली तर ऑक्टोबर मध्ये पहिल्या दोन आठवड्यात तब्बल १२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रथमच ऑक्टोबरमध्ये देखील अगदी दिवाळी येईपर्यंत पाऊस कोसळल्याने शेतातील उभ्या पिकांची वाट लावली.

मका शेतातच काळा पडला

तालुक्यात झालेल्या विक्रमी पाऊसामुळे बाजरीच्या कणसांना कोंब फुटले, कापूस काळवंडला, सोयाबीन तर सडलेल्या अवस्थेत शेतातून काढण्याची वेळ आली. शेतकऱ्यांनी घेतलेले कांद्याचे रोपे अक्षर:शा वाहून गेले. लागवड झालेला कांदाही वाफ्याच्या मातीत दाबून गेला. अशा सर्वांगीण नुकसानीमुळे गुंतवलेले भांडवलही मातीत गेल्याने यंदा शेतकरी आर्थिकदृष्ट्या भरडला गेला आहे. तालुक्यात खरिपाचे सर्वाधिक क्षेत्र मकाचे असून तब्बल ५ हजार हेक्टरवर मकाचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल २२०० हेक्टर सोयाबीनचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची झळ १३ हजार ४६६ शेतकऱ्यांना बसली असून गुंतवलेले भांडवलही मिळाले नाही.

नियमाने मोडले बळिराजाचे कंबरडे

सरकारच्या अजब कारभाराची झळ येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बसली आहे. सलग तीन महिने पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र शासनाच्या नियमांच्या कचाट्यात येथील शेतकरी अडकला आहे. नियमानुसार ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तरच भरपाई मिळते. त्यामुळे तालुक्यात कोट्यावधीचे नुकसान होऊनही शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित राहिले आहे. सुमारे ९ हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. पिके सडले पण अद्याप शेतकऱ्यांना एक रुपयाचीही मदत मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आता महसूल व कृषी विभागाने विशेष बाब म्हणून पंचनामे करून त्याचा अहवाल शासन दप्तरी पाठविला असून विशेष बाब म्हणून हा ३३ टक्के वरील नुकसानीचा अहवाल पाठविला असल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी सांगितले.

असे झाले पीक नुकसानीचे पंचनामे...

- ऑगस्टमध्ये ३ हजार ८७ शेतकऱ्यांचे २ हजार ४८ हेक्टरवर नुकसान

- सप्टेंबरमध्ये ७ हजार ८७८ शेतकऱ्यांचे ४ हजार ३९८ हेक्टरवर नुकसान

- ऑक्टोबरमध्ये २ हजार ५१० शेतकऱ्यांचे १ हजार ७१० हेक्टरवर नुकसान

- पिकनिहाय ३३ टक्क्यांवर झालेले नुकसान

बाजरी - २६ हेक्टर

मका - ५१७४ हेक्टर

कापूस - १८६ हेक्टर

भुईमूग - ७ हेक्टर

सोयाबीन - २२४९ हेक्टर

तूर - ०.२० हेक्टर

कांदा - ४१७ हेक्टर

भाजीपाला - ६१ हेक्टर

डाळिंब - २१ हेक्टर

द्राक्ष - १३ हेक्टर

एकूण - ८१५७ हेक्टर

"मुसळधार व सततच्या पावसाने डोळ्यादेखत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ऐवढे होवूनही शासकीय मदत न मिळणे हा गरीब शेतकऱ्यांवर अन्याय आहे. नुकसानीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. महसूल व कृषी यंत्रणेने पंचनामे केले आहे. आता प्रतिक्षा आहे ती नुकसान भरपाई देवून आधार देण्याची." - सुभाष वाघ, माजी सरपंच, राजापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT