crow nest esakal
नाशिक

कावळ्याचे घरटे देताहेत चांगल्या पावसाचा सांगावा!

रामदास कदम

दिंडोरी (जि.नाशिक) : कावळा आणि माणूस यांचा एकमेकांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. प्राणिमात्रांत जसा माणूस, तसा पक्ष्यांमध्ये कावळा अतिशय हुशार आहे. या वर्षी पाऊस जास्त असल्याचा अंदाज हवामान खात्याने (weather forecast) वर्तविलेला असून, पहिल्या दीर्घकालीन अंदाजानुसार यंदा ९६ ते १०४ टक्के पाऊस अपेक्षित आहे. नेमका हाच अंदाज कावळ्यांच्या घरटे बांधण्याच्या सवयींवरूनही लावला जात असून, यंदा कावळे शक्यतो जाड फांदी पाहून घरटी बांधताना दिसून येत आहेत. हादेखील हंगामातील जास्त पावसाचा एक संकेत मानला जातो. (crow-nest-giving-sign-of-good-rain-nashik-marathi-news)

हवामान खात्याच्या दीर्घकालीन अंदाजाशी साम्य

यंदा लॉकडाउनमुळे त्रस्त असलेल्या सर्वांनाच हा अंदाज दिलासा देणारा ठरणार आहे. शेतकरी आजही आपल्या पारंपरिक कसोट्या, बदलती निसर्गचित्रे याचा अंदाज घेत असतो. मृग नक्षत्रापूर्वी पक्षी झाडांवर घरटी बांधू लागले की पावसाची चाहूल लागते. पारंपरिक अंदाजानुसार पक्षी झाडावर किती उंचीवर, कोणत्या प्रकारच्या फांदीवर घरटे बांधतो यावरून यंदा पाऊस कसा होईल याचे अनुमान शेतकरी आपापल्या परीने काढतात व त्यानुसार खरीप पिकांच्या तयारीला लागतात. यंदा कावळा झाडाच्या जाड फांदीवर घरटे बांधत असल्याचे दिसून आले असून, हे चांगल्या पावसाचे भाकीत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच, हवामान खात्यानेही यंदा पावसाच्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजानुसार ९६ ते १०४ टक्के पाऊस होईल, असे म्हटले आहे.

यंदाची घरटी चांगल्या पावसाची सूचक

विशेष म्हणजे कावळ्याचे घरटे यंदा झाडांच्या मजबूत फांदीवर अन्‌ शेंड्यापासून बरेच मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे या वर्षी पर्जन्यमान काही ठिकाणी जास्त, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे राहील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो आहेच. पक्ष्यांना व विशेषत: कावळ्यांना पावसाचा तंतोतंत अंदाज कळतो, असे म्हटले जाते. त्यानुसार ते आपली तजवीज करतात. या संकेतांनुसार जाड फांदीवर घरटे असल्याचा अर्थ, यंदा पाऊस जोरदार आणि वादळी वाऱ्यासह होणार आहे. जेव्हा पक्षी उंच शेंड्याकडील फांदीवर घर बांधतो, तेव्हा त्याला पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज आलेला असतो. त्यामुळे यंदाची घरटी चांगल्या पावसाची सूचक मानली जात आहेत. यापूर्वीही विविध पारंपरिक ठोकताळ्यांवरून पर्जन्यवृष्टीचे आकलन केले जात असे. झाडावर पक्ष्यांनी बांधलेली घरटी कशा प्रकारची, कुठे बांधली आहेत याचा आधार घेत पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे यंदाचे एकूणच सारे संकेत जोरदार पर्जन्यवृष्टी होईल हेच स्पष्ट करणारे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT