crow bird eating tobacco packet
crow bird eating tobacco packet esakal
नाशिक

नाशिकमधील कावळा व्यसनांचा ठरणार बळी!; जाणुन घ्या कारण

आनंद बोरा

नाशिक : नाशिकमधील कावळा व्यसनांचा बळी ठरणार! धक्का बसला ना हे वाचून? पण हे वास्तव शहरवासीय उघड्या डोळ्यांनी पाहताहेत. काय घडतंय... कावळे रस्त्यावर, टपऱ्यांजवळ पडलेली तंबाखूजन्य पदार्थांची रिकामी पाकिटे चोचीत पकडून माणसांनी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेल्या पात्रात टाकतात. पाकिटे ओली झाल्यावर आतील भागातील कागद कावळे मनसोक्त खाताहेत. (crows in Nashik in danger due to tobacco users Nashik Latest Marathi News)

शहराच्या विविध भागांत हे दृश्‍य पाहिल्यावर तंबाखूजन्य पदार्थांची कावळ्यांना सवय लागली आहे काय, अशा शंकेची पाल चुकचुकते. खरे म्हणजे, अगोदरच आताच्या पितृपक्ष पंधरवड्यात घासाला स्पर्श करण्यासाठी कावळ्यांचा शोध घेण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.

त्यात कावळ्यांना जडलेली ही सवय पाहिल्यावर काळजाचा ठोका चुकल्यागत होते. माणसांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाताहेत. मग आता असा प्रश्‍न तयार होतो, तो म्हणजे, तंबाखूजन्य पदार्थांची सवय लागलेल्या पक्ष्यांसाठी कधी पावले उचलली जाणार आहेत.

शहरातील स्वच्छतेसाठी कावळा पूरक मानला जातो. शहरात डोमकावळा आणि गावकावळा असे कावळ्याचे दोन प्रकार पाहावयास मिळतात. मनुष्य वस्तीच्या जवळ हमखास आढळणारा हा पक्षी कोकिळेसारख्या पक्ष्यांच्या पिलाला वाढविण्याचे काम करतो. शहरीकरणाच्या रेट्यात कावळे घरटी बनविताना काड्यांसोबत आता लोखंडी तारा वापरत आहेत. अशातच, तंबाखूजन्य पदार्थांच्या लागलेल्या सवयीमुळे कावळे दगावण्याची भीती पशुवैद्यकीय क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे.

"पक्ष्यांची ही कृती धक्कादायक आहे. कावळ्यांना न्यूकोटिनचे व्यसन लागल्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. मात्र कावळ्यांचे नमुने तपासले जात नाहीत तोपर्यंत अधिक सांगता येत नाही. मात्र पक्ष्यांना एकूण स्थिती पाहता, व्यसन लागल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात."

-डॉ. संजय गायकवाड, पशुसंवर्धन उपायुक्त, औरंगाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT